Home /News /viral /

आगीतून वाचलेल्या अस्वलाने मारली माणासाच्या पायाला मिठी, VIRAL VIDEO चे सत्य काय?

आगीतून वाचलेल्या अस्वलाने मारली माणासाच्या पायाला मिठी, VIRAL VIDEO चे सत्य काय?

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्य़ा आगीतून अस्वलाचं हे पिल्लू वाचवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. काय आहे सत्य जाणून घ्या

    मुंबई, 07 जानेवारी: एक छोटंस अस्वलाचं पिल्लू तरुणाचे पाय पकडून उभं आहे. ते तरुणाला जागेवरून हलू देत नाही. भावनिक असणारा हा VIDEO सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील आगीतून वाचलेल्या अस्वलाच्या पिल्लाचा असल्याचं सांगितलं जात आहे. अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली होती. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत होती. या आगीत जवळपास 50 कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. त्यातील काही प्राण्यांचा जीव वाचवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ दोन दिवसांपासून VIRAL झाला आहे. या VIDEO मध्ये अस्वलाचं पिल्लू तरुणाला बिलगलं आहे. तरुणाचे पाय धरून त्याला जाऊ नये यासाठी विनवणी करत आहे. अस्वलाच्या पिल्लाचं तरुणावर असलेलं प्रेम पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. भावुक करणारा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यातून पिल्लाला वाचवल्यानंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र न्यूज 18ने या VIRAL VIDEOमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर VIRAL होत असणारा हा व्हिडिओ नक्कीच भावुक करणारा आहे. मात्र हा ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीनंतरचा नाही. हा video 2011 सालचा असल्याचं लक्षात आलं. त्याला एडिट करून पुन्हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॅप्शनने VIRAL करण्यात आला. मात्र epicrussia नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ 9 ऑगस्ट 2011 रोजी अपलोड करण्यात आला होता. अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर अनेक वेळा हा व्हिड़िओ एडिट करून व्हायरल करण्यात आला होता. अमेझॉनच्या जंगलात लागलेल्य़ा आगीनंतरही हा व्हिडिओ व्हायरल झाल्य़ाची माहिती मिळाली होती. आता पुन्हा 2 दिवसांपासून हा अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत होते मात्र ह्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. आग नैसर्गिक कारणांमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. अॅमेझॉनप्रमाणे या जंगलातदेखील वणवे लागतात. या वर्षी दुष्काळाच्या झळा प्रचंड बसल्या होत्या. ऊन आणि वेगाचा वारा यामुळे आग झपाट्याने पसरली. त्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Australia

    पुढील बातम्या