मुंबई, 08 फेब्रुवारी: स्वभावानं शांत असणारा हत्ती जेव्हा चिडतो तेव्हा काय होतं याचा प्रत्यय आल्याचे अनेक व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर आपण पाहात असतो मात्र तरीही हत्तीची कळ काढण्याचं प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्ता क्रॉस करणाऱ्यासाठी थांबलेल्या हत्तीला अडवून भरधाव दुचाकीस्वार ऐटीत निघाला असताना हत्तीला त्याचा राग आला आणि त्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
बिथरलेल्या दुचाकीस्वारानं बाईकचा स्पीड वाढवल्यामुळे हत्तीला पाठलाग करणं शक्य झालं नाही. त्यामुळे हत्ती पुन्हा आपल्या वाटेनं रस्त्या क्रॉस करून निघून गेला. मात्र तरुणाचं अशा प्रकारचं वर्तन त्याच्या जीवावर बेतू शकलं असतं अशी भीतीही युझर्सनी व्यक्त केली आहे.
You know what is most difficult part of #wildlife management. Managing the #humans. Even after blocking the road by staff this person decided to cross it while others were waiting. Just missed by fraction of a second from becoming a memory. Don't do this ever. pic.twitter.com/CbL0e3gCDj
प्रवीण कासवान, IFS यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत तरुणांना अशा पद्धतीनं वर्तन न करण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटरवर या व्हिडिओला 450हून अधिक रिट्विट करण्यात आलं असून 1.7 हजार लोकांनी लाईक केलं आहे.
एकूणच माणसांच्या अशा वृत्तीचा विचार करता नक्की कोण प्राणी आहे? असा सवाल युझर्सनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओवर अनेक युझर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.