Home /News /viral /

समुद्रात बुडत होता मुलगा, कॉल करून म्हणाला 'मी मरतोय...'; पाहा थरारक LIVE VIDEO

समुद्रात बुडत होता मुलगा, कॉल करून म्हणाला 'मी मरतोय...'; पाहा थरारक LIVE VIDEO

वेल्सच्या किनाऱ्यावर असे काहीतरी घडले, जे पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही. एक 17 वर्षीय मुलगा बुडत होता, मात्र त्याच्या एका निर्णयामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला.

    वेल्स, 08 सप्टेंबर : काही व्हिडीओ असे असतात जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं तर काही व्हिडीओ अविश्वसनीय असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेल्सच्या किनाऱ्यावर असे काहीतरी घडले, जे पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही. एक 17 वर्षीय मुलगा बुडत होता, मात्र त्याच्या एका निर्णयामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला. वेल्सच्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात हा मुलगा मदत मागताना दिसत आहे. Ladbibleच्या वृत्तानुसार 17 वर्षीय अल्फी ग्वायनेडच्या किनाऱ्यावर पॅडलबोर्डिंग करत होता. 10 ऑगस्ट रोजी तो आपल्य़ा बोर्डपासून वेगळा झाला. पॅडलबोर्डवर पडण्यापूर्वी त्याने आपला मोबाइल वॉटरप्रूफ पाउचमध्ये ठेवला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्यूशनने (RNLI) जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये मुलगा मदतीसाठी हाक मारताना दिसत आहेत. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी केलेले रेस्क्यू ऑपरेशनही दिसत आहे. आपत्कालीन कॉलमध्ये अल्फीला ऑपरेटरला बुडत असल्याचे सांगताना एकू येत आहे. वाचा-माशीला मारायला गेला अन् घरात झाला स्फोट, तुम्हीही ही चूक करत असाल तर सावधान! वाचा-चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि... अल्फीने फोनवर सांगितले की, “मी किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर आहे. ते कुठे आहे हे मला ठाऊक नाही.” कोस्टगार्ड रेस्क्यू ऑपरेटरने त्याला विचारले की तो पॅडलबोर्डवर आहे का? त्यावर तो म्हणाला की, “मी पॅडलबोर्डवर होतो, पण मी आता बुडत आहे". यावर रेस्क्यू ऑपरेटरने घाबरू नको आणि जागा रहा असे सांगितले. त्यानंतर अल्फीचे बचावकार्य सुरू झाले. वाचा-VIDEO : हत्तीला आला राग म्हणून सोंडेनं उचलली सायकल; तरुणाचा थोडक्यात वाचला जीव अल्फीचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आला होता. वेल्स ऑनलाईनच्या म्हणण्यानुसार बचाव रेस्क्यू ऑपरेटरने सांगितले की अल्फीने व्हेटसूट, लाइफजॅकेट घालण्याच्या आणि फोन वॉटरप्रूफ पाउचमध्ये ठेवण्याच्या निर्णयामुळे वाचला. बचावकर्त्यांनी 40 मिनिटात अल्फीचा शोध घेतला. त्यानंतर त्याला एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Rescue operation, Video viral

    पुढील बातम्या