नवी दिल्ली, 26 एप्रिल: सोशल मीडियावर (Social Media) बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातील कोणता व्हिडिओ कधी ट्रेंड करेल याचा काही नेम नसतो. असाच एका महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral Video) होत आहे. ही महिला तिच्या नवऱ्याला फसवत होती. म्हणजे पती घरी नसला की ती तिच्या प्रियकराला घरी बोलवून घ्यायची. मात्र, एके दिवशी तिचा पती घरी लवकर परतला आणि तिचं बिंग फुटलं. त्यानंतर त्यांच्या घरात राडा झाला की प्रकरण निपटलं याबद्दल मात्र कल्पना नाही.
नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर टिकतं. त्यामुळे दोन्हीकडून या नात्यात प्रामाणिकपणा असणं आवश्यक असतं. मात्र, दोघांपैकी एकानेही विश्वासघात केला. तर, मग त्याची परिणती हे नातं तुटण्यात होते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामधील धोकेबाज पत्नीला जगभरातील नेटकरी ट्रोल करत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
पती बाहेर जाताच प्रेमी यायचा घरी -
@souljonnyzया ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय -Cheating wife, Caught in the Act; म्हणजेच धोकेबाज पत्नी, रंगेहाथ सापडली. आपला पती कामासाठी बाहेर जाताच ही पत्नी आपल्या प्रियकराला घरी बोलावून घेत असे. मात्र, तिच्या पतीला याबाबत संशय निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या नकळत घरात कित्येक ठिकाणी कॅमेरे बसवून घेतले होते.
व्हिडिओत कैद झाला सगळा प्रकार -
ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, त्या दिवशीही हा पती कामासाठी बाहेर गेला होता. पती बाहेर जाताच महिलेने नेहमीप्रमाणे आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. हे दोघं किचनमध्ये रोमान्स करत असतानाच महिलेचा पती घरी परत आला. यानंतर घाबरलेला प्रियकर किचनमध्येच लपून बसला. इकडे पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र पती किचनमध्येच येण्यावर अडून बसला. यानंतर किचनमध्ये झालेला सगळा तमाशा तिथल्या छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला.
Cheating wife , Caught in the Act .#ViralVideo pic.twitter.com/ohaH3OXb5a
— Jonathan T. (@souljonnyz) April 18, 2021
दरम्यान, या महिलेचं नंतर काय झालं,त्यांनी घटस्फोट घेतला का, किंवा त्या पतीने पोलिसांमध्ये तक्रारदाखल केली का या प्रश्नांची उत्तरं काही समोर आली नाहीत. त्यामुळे सध्यातरी या व्हिडिओवर चर्चा सुरू आगे इतकंच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relation, Viral video.