Home /News /viral /

शिकार करण्यासाठी आलेल्या मांजरीला सरड्यानं पळवून लावलं, पाहा मजेशीर VIDEO

शिकार करण्यासाठी आलेल्या मांजरीला सरड्यानं पळवून लावलं, पाहा मजेशीर VIDEO

सरड्यापेक्षा मांजर हुशार आणि मोठी असूनदेखील सरड्याच्या भीतीनं मांजर हवेत उडी मारून पळ काढते.

    मुंबई, 08 सप्टेंबर : शिकारीदरम्यान अनेक मजेशीर प्रसंग घडतात आणि ते क्षण फार कमी वेळा कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळत असते. वाघाच्या जबड्यातून रान डुकराच्या पिल्लाला वाचवणाऱ्या आईचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होत असताना आणखीन एक शिकार फसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मांजर आणि सरड्याचं तसं वाकडंच. सरड्याची शिकार करण्यासाठी आलेल्या मांजर त्यालाच पाहून पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. य़ामध्ये आपण पाहू शकता की हिरव्या रंगाचा सरडा जात असताना अचानक मांजर दबा धरून त्याची शिकार करण्याचा डाव साधते मात्र सरड्याला हे कळतं आणि तो असं काही करतो की खेळ फसतो. हे वाचा-आधी चोरला 45 हजारांचा फोन, वापरता आला नाही म्हणून मालकालाच घरी बोलवलं सरड्यापेक्षा मांजर हुशार आणि मोठी असूनदेखील सरड्याच्या भीतीनं मांजर हवेत उडी मारून पळ काढते. या व्हिडीओवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कुणी कंगना आणि संजय राऊत यांना या दोघांमधील लढाईत धरून कमेंट्स केल्या तर काही युझर्सनी स्मार्ट शिकार करायला मांजरीनं शिकायला हवं असंही म्हटलं आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 46.2 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून 400 हून अधिक युझर्सनी रिट्वीट केला आहे. तर 50 जणांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला तर राजकीय कमेंट्सही आल्याचं पाहायला मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या