मराठी बातम्या /बातम्या /Viral /भलामोठा साप पाहून सुरू झाली पळापळ; तरुणीने धाडस करत पकडले, VIDEO VIRAL होताच होतोय कौतुकांचा वर्षाव

भलामोठा साप पाहून सुरू झाली पळापळ; तरुणीने धाडस करत पकडले, VIDEO VIRAL होताच होतोय कौतुकांचा वर्षाव

स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या मदतीला जाण्याची वृत्ती आणि सापांविषयी असलेलं प्रेम याबद्दल लोकांकडून मनापासून प्रशंसा होत आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या मदतीला जाण्याची वृत्ती आणि सापांविषयी असलेलं प्रेम याबद्दल लोकांकडून मनापासून प्रशंसा होत आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या मदतीला जाण्याची वृत्ती आणि सापांविषयी असलेलं प्रेम याबद्दल लोकांकडून मनापासून प्रशंसा होत आहे.

  नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : साप (Snake) असं नुसतं म्हटलं तरी अनेकांची पळता भुई थोडी होते. आपल्या देशात तर सापाची, नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. तरीही साप दिसला की त्याला मारायचे असाच शिरस्ता आहे. सगळे साप विषारी नसतात त्यामुळे कोणताही साप दिसला तर घाबरून त्याला मारू नका असं कितीही सांगितलं तरीही साप मारण्याचे प्रकार घडत असतात. मात्र पूर्वीच्या तुलनेत अलीकडच्या काळात याबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे साप दिसला तरी अनेक लोक आपल्या जवळपास कोणी सर्पमित्र असेल तर त्यांना कळवतात. ते येऊन साप पकडतात आणि त्यांना लांब ठिकाणी सोडून देतात. अनेक धाडसी लोकांना सापाची भीती वाटत नाही. अगदी सहजपणे ते साप हाताळतात. अशाच एका धाडसी मुलीचा (Brave Girl) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  एक भलामोठा काळा साप (Big Black Snake) अचानक एका सार्वजनिक ठिकाणी आला. हा साप पाहून अनेक लोकांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, एक माणूस पुढं आला आणि त्यानं या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला ते जमत नव्हतं. त्याचवेळी एक मुलगी पुढं आली आणि तिनं त्या सापाला हातांनी उचलून जवळच्या तलावात सोडलं. तिचं हे धाडस, धैर्य बघून आजूबाजूचे लोक थक्कच झाले असं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा आहे हे मात्र स्पष्ट होत नाहीए. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  बहिणीची छेड काढल्याने तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, नागपुरातील घटना

  गर्दीतील काही लोकांनी याचा व्हिडीओ बनवला. त्यापैकी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवर (Twitter) ‘@Ffs_OMG’ नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत असून, आतापर्यंत 64 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी तो शेअर केला असून, त्यावर अनेकांनी कमेंट्स करत या मुलीच्या धाडसाला दाद दिली आहे. तिचं कौतुक केलं आहे. ‘या मुलीला पाहून असं वाटतं की ती रोज सापांबरोबर ‘खेळते’, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

  या व्हिडीओत ती मुलगी अगदी सहजपणे त्या भल्यामोठ्या काळ्याकुळकुळीत सापाला हातात उचलून तलावात नेऊन सोडत असल्याचं दिसत आहे. तो साप बघून अनेकांची भीतीनं बिकट अवस्था झालेली असताना तो साप हातात घेताना या मुलीच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही. हा साप विषारी असण्याची शक्यता असूनही तिनं आपला जीव धोक्यात घालत लोकांचा आणि त्या सापाचा जीव वाचवला आहे. तिची स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांच्या मदतीला जाण्याची वृत्ती आणि सापांविषयी असलेलं प्रेम याबद्दल लोकांकडून मनापासून प्रशंसा होत आहे.

  First published:

  Tags: Viral, Viral videos