मुंबई, 25 डिसेंबर : अनेकदा जीव धोक्यात घालून बाईक किंवा कार किंवा लोकल-ट्रेनमध्ये स्टंट केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या चर्चा रंगलीय ती एक सायकलस्वाराची. हा सायकलस्वार लिलया पेलत अगदी श्वास रोखायला लावणारे स्टंट करत आहे. जीव धोक्यात घालून हे स्टंट अगदी कुशलपणे सायकलवरून पार पडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक तरुण सायकल चालवताना दिसतो. सायकल चालवण्यामध्ये आता काय मोठा विजय आहे याबद्दल तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या तरुणानं समुद्राच्या बाजूच्या रेलिंगवर सायकल चालवून सर्वांना आश्चर्यचकित केले. अशा पद्धतीनं स्टंट केलेल्या स्टंटमुळे सर्वांतं आश्चर्याचा धक्का बसला आहे.
It's usually happening with those guy's who have 100 % confidence in themself & their abilities , so all externalities faint away infront of these unique personalities...
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की समुद्राकिनारी लावलेल्या रेलिंगवर हे जीवघेणे स्टंट केले जात आहेत. 361 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हवेचा दाब वाढत जातो तसं तो हवेला टॅकल करत पुढे सरकतो. हा व्हिडीओ दिग्विजयसिंग खत्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.