कोलंबिया, 23 सप्टेंबर : लॉकडाऊन आणि कोरोना काळात लहान मुलांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. कुठे छतानवरून पडताना तर कधी घरी एकटा असलेल्या मुलाला खेळताना पडल्यानंतर वाचवल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता अंगावर काटा आणणारा आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता बाबागाडीतून जाणारा चिमुकला अचानक रस्त्यावरून घरंगळत खाली जातो आणि पडणार एवढ्यात दुचाकीस्वार त्याला पाहतो. आपली धावत्या दुचाकीला धूम स्टाइलनं ब्रेक मारतं दुचाकी रस्त्यात टाकून आधी या मुलाचा जीव वाचवतो. ह्या दुचाकीस्वाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कोलंबियातील स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना फ्लोरेंसिया रिनकॉन डेला अॅक्ट्रेला परिसरात 14 सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती मिळाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं दुचाकी सोडून उडी मारतो त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
ह्या संपूर्ण प्रकारात तरुण या चिमुकल्याचा जीव वाचवतो. तोपर्यंत त्याला सांभाळणारी महिला तिथे पोहोचते आणि हा सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो. ट्वीटरवर हा व्हिडीओ 1.7 लाख मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 3 लाखहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.