...आणि दोन कांगारू एकमेकांना भिडले, दुर्मीळ लढाईचा VIDEO VIRAL

...आणि दोन कांगारू एकमेकांना भिडले, दुर्मीळ लढाईचा VIDEO VIRAL

एका युझरनं हे सेटलमेंटसाठी भांडत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरनं हे भांवड असून एकमेकांच्या उरावर बसून भांडत असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट: मुंगुस साप, कुत्रा मांजर किंवा अगदी वाघाचीही लढाई किंवा शिकारीचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान चर्चा आहे ती कांगारूंची. कांगारूच्या अनेक गमती-जमतीचे व्हिडीओ आपण पाहिले असतील पण त्यांच्यातल्या लढाईला किंवा रागवल्यावर काय होतं हे सांगणारा व्हिडीओ पाहायला मिळणं फार दुर्मीळ.

दोन कांगारूंच्या लढाईचा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता अक्षरश: दोन कांगारू एकमेकांना भिडले आहेत. अंगावर पडून एकमेकांना मारत आहेत. यांचा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी ट्वीट केला आहे. दरम्यान अत्यंत दुर्मीळ असलेला व्हिडीओ युझर्सनी खूप पसंत केला आहे.

एका युझरनं हे सेटलमेंटसाठी भांडत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरनं हे भांवड असून एकमेकांच्या उरावर बसून भांडत असल्याचं म्हटलं आहे.

सुशांत नंदा यांनी केलेल्या ट्वीटला आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 356 लोकांनी लाईक केला असून 66 लोकांनी रिट्वीट केला आहे. कांगारुंची लढाई पाहायला मिळणं अत्यंत दुर्मीळच पण हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी खूप पसंत केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 10:36 AM IST

ताज्या बातम्या