ग्वालियर, 6 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) जिल्ह्यातून हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे बहोडापुर भागात हुंड्यासाठी जावयाने सासरी असलेल्या पत्नीला बेल्टने मारहाण केली. यानंतर मुलीकडील मंडळींनीही जावयाची धुलाई केली. शनिवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात FIR दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुशवाह भागात राहणारी साधना कुशवाह हिचं लग्न एक वर्षांपूर्वी गिरगावातील अमन कुशवाह याच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर अमनची पत्नी साधना आणि तिच्या आई-वडिलांकडून हुंड्याची मागणी करीत होता. अमन हुंड्यासाठी साधनावर अत्याचार करीत होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने 10 लाखांची मागणी केली. जेव्हा साधनाने हुंडा देण्यास नकार दिला तर तिला घराबाहेर काढण्यात आलं. यानंतर साधना माहेरी येऊन राहू लागली.
असा सुरू झाला वाद
जेव्हा साधना सासरी गेली नाही तर गेल्या आठवड्यात अमन आपली आई, भाऊ, बहीण यांना सोबत घेऊन साधनाच्या घरी पोहोचला. जावई सासरी गेल्यानंतर पत्नी आणि तिच्या वडिलांना शिव्या देऊ लागला. यादरम्यान अमनने पत्नी साधनाला बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मुलीच्या वडिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अमनचीदेखील मुलीच्या कुटुंबाने चांगलीच धुलाई कली. यानंतर जवळपासच्या लोकांनी मध्यस्थी करीत वाद सोडवला. या घटनेनंतर साधनाने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.