अंड्यातून बाहेर आलेल्या सापाचं पिल्लू चढलं तरुणाच्या हातावर, पुढे काय झाल पाहा VIDEO

अंड्यातून बाहेर आलेल्या सापाचं पिल्लू चढलं तरुणाच्या हातावर, पुढे काय झाल पाहा VIDEO

सापाचं पिल्लू अंड्यातून बाहेर येताना पाहिलंय का?

  • Share this:

मुंबई, 06 जुलै: सोशल मीडियावर साप लढाई करताना किंवा शिकार करताना अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. साप कात कशी टाकतो हे दाखवणारे ही व्हिडीओ समोर आले. पक्ष्यांची पिल्लं अंड्यातून बाहेर येताना अनेकांनी पाहिली आहे पण सापाचं पिल्लू कसं बाहेर येत? रंग रुप कसं असतं हे फार दुर्मीळ पाहायला मिळत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अंड्यातून साप कसा बाहेर येतो हे पाहायला मिळत आहे. हे साप अंड्यातून बाहेर पडून थेट तरुणाच्या हातावर चढत आहेत. ब्रीरुअर असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं सापांचं दुकान आहे. इथे हा तरुण वेगवेगळ्या प्रकारचे साप पाळतो. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सापाला अलबिनो कोर्न स्नॅक असं म्हटलं जातं.

हे वाचा-एक नंबर! फक्त 60 सेकंदात 'या' भारतीयानं साऱ्या जगाला शिकवलं फिजिक्स

हे वाचा-मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? मजुराचा हा डान्स VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक

एका दिवसात हा व्हिडीओ 76 लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला 11 हजारहून अधिक लाईक मिळाल्या आहेत. मला साप आवडत नाहीत पण हा व्हिडीओ पाहून सापांप्रती प्रेम वाटायला लागलं आहे असं एका युझरने म्हटलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अंडीमधून साप कसे बाहेर येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

Published by: Kranti Kanetkar
First published: July 6, 2020, 11:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading