मुंबई, 29 जानेवारी: tik tok व्हिडिओ आला की तो लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतो. काही शैक्षणिक, रेसिपी, सिरियस विषयाला धरून तर काही गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्यानं व्हायरल होत असतात. सध्या एका व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका पायलटनं विमानाची काच चक्क पाण्यानं पुसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे. तर या पायलटनं कारच्या काचा पुसतात तसंच काहीसं विमानाची काच पुसल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की य़ा व्हिडिओमध्ये पायलट पाणी पिण्याच्या बाटलीतून विमानाची काच उघडून पाणी काचेवर टाकतो आणि काच पुसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ भारतातला नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र अशा प्रकारचे इंडियन जुगार भारतात केले जातात असंही काही युझर्स म्हणणं आहे. 102.6 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 562 युझर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.