VIDEO : ब्रेन सर्जरीचं केलं फेसबुक लाइव्ह, पेशंट डॉक्टरांशी मारतेय गप्पा

VIDEO : ब्रेन सर्जरीचं केलं फेसबुक लाइव्ह, पेशंट डॉक्टरांशी मारतेय गप्पा

अमेरिकेच्या मेथॉडिस्ट डलास मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांना एका पेशंटचा हट्ट पुरवावा लागला. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी काही वेळ या ऑपरेशनचं फेसबुक लाइव्ह केलं.

  • Share this:

टेक्सास, 2 नोव्हेंबर : अमेरिकेच्या मेथॉडिस्ट डलास मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांना एका पेशंटचा हट्ट पुरवावा लागला. टेक्सासमध्ये राहणाऱ्या जेनना स्क्राड्रर्टच्या मेंदूमधल्या एका भागात रक्त गोठल्याने ही सर्जरी करावी लागणार होती. जेननाच्या हट्टामुळे ही सर्जरी फेसबुकवर लाइव्ह दाखवण्यात आली.सर्जरीनंतर आपण बोलण्याची क्षमता गमावून बसू, अशी भीती जेननाला वाटत होती. त्यामुळे ऑपरेशनमध्ये जागं राहून बोलत राहण्याची तिची इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी काही वेळ हे ऑपरेशन फेसबुक लाइव्ह केलं. यामध्ये ती डॉक्टरांशी गप्पा मारताना दिसतेय.

25 वर्षांच्या जेननाला पडद्याआडून लाइव्ह दाखवण्यात आलं. डॉक्टर जेव्हा हे ऑपरेशन करत होते तेव्हा तिला आरसा दाखवून याबद्दल माहिती देण्यात आली.

या मेथॉडिस्ट डलास मेडिकल सेंटरच्या न्युरॉलॉजीचे प्रमुख हे भारतीय वंशाचे डॉक्टर निमेश पटेल आहेत तर जेनना स्काड्रर्ट ऑक्युपेशनल थेरपीची विद्यार्थिनी आहे. या फेसबुक लाइव्हमधून आपला अनुभव सगळ्यांसबोत शेअर करण्याची तिची इच्छा होती. तिचा हा व्हिडिओ फेसबुकवर अनेकांनी पाहिला. याबद्दलची बातमी येण्याआधीच हा व्हिडिओ 1 लाख 66 हजार लोकांनी पाहिला होता.

(हेही वाचा : SBI चा अलर्ट, 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करा हा फॉर्म)

या प्रेक्षकांनी जेननाच्या हिंमतीचं कौतुक केलंच पण या मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांचंही अभिनंदन केलं. या ऑपरेशनचा पूर्ण व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा या हॉस्पिटलने केली आहे.

=====================================================================================

VIDEO : शपथविधीच्या घोषणेवरून संजय राऊतांनी पुन्हा भाजपला फटकारले, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading