VIDEO : मुली साखरझोपेत असताना अचानक घुसला 8 फूट लांब कोब्रा आणि...

VIDEO : मुली साखरझोपेत असताना अचानक घुसला 8 फूट लांब कोब्रा आणि...

सप्टेंबर 2019मध्येही अशा प्रकारे साप घुसला होता. त्यावेळी एका विद्यार्थिनीला दंश केल्यानं तिचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

कोयंबटूर, 19 जानेवारी: तुम्ही रात्री अर्ध्या झोपेत असताना अचानक बाथरूममध्ये गेलात आणि समोर 8 फूट लांब कोबरा फणा काढून उभा असेल तर काय हाल होतील याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र हा प्रकार खरंच घडला आहे. वसतीगृहामध्ये रात्रीच्या सुमारास मुली साखरझोपेत असताना अचानक 8 फूट लांब कोबरा बाथरूममध्ये घुसला. बाथरुममध्ये आलेल्या मुलींनी आरडाओरडा सुरु केल्यानं बेचैन झालेल्या सापानं बाहेर पडण्यासाठी धडपड केली.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. घाबरलेल्या मुलींचा आरडाओरडा सुरू आहे. तर साप पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता. आरशावर चढून बेसीनवर चढून त्याने बाहेर जाण्याचा मार्ग कुठे मिळेल यासाठी धडपड सुरू होती. मात्र बेसिन आणि भिंतीवर असलेल्या फर्शीमुळे त्या भिंतीवर चढता येत नव्हतं.

हा 8 फूट मोठा कोब्रा पाहून कुणाच्या अंगावर काटा येतील आणि साखर झोपेत असेला खडबडून जागा होईल. नुसता साप पाहिला तरी बोबडी वळते अशात काळ्या रंगाचा हा 8 फूट लांब कोब्रा पाहून झोपेत असलेल्या विद्यार्थिनींची काय अवस्था झाली असेल याचा विचारही अंगावर काटा आणणारा आहे.

हा व्हिडिओ तमिळनाडुतील भारतीयार यूनिवर्सिटीच्य़ा (Bharathiar University) मुलींच्या वसतीगृहातील असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. या आधीही सप्टेंबर 2019मध्ये याच वसतिगृहात सापानं दंश केल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाला होता. सुदैवानं या घटनेमध्ये कोब्र्यानं कुणालाही दंश केला नाही. वारंवार अशा पद्धतीनं साप वसतीगृहात येत असल्यानं वसतीगृहातील प्रशासनाकडून यावर काही उपाय का केले जात नाहीत तसंच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही वारंवार ऐरणीवर येत आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये विद्यार्थिनींना काही झालं तर त्याची जबाबदारी वसतीगृह घेणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

First published: January 19, 2020, 7:58 AM IST

ताज्या बातम्या