बापरे! कोंबड्या पळवणाऱ्यासाठी लावला सापळा आणि...पुढे काय झालं पाहा VIDEO

कोंबडीचोराला पकडण्यासाठी हा ट्रॅप लावल्याचं कॅप्शनमध्ये युझरनं व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे.

कोंबडीचोराला पकडण्यासाठी हा ट्रॅप लावल्याचं कॅप्शनमध्ये युझरनं व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : सोशल माडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोंबड्यांची शिकार करणाऱ्यासाठी एक ट्रॅप लावण्यात आला आणि या ट्रॅपमध्ये साप अडकला. त्यावेळी काय झालं हे देखवणारा हा व्हिडीओ आहे. हा साप 30 फूट लांब अॅनकोंडा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता अॅनाकोंडा पकडण्यासाठी सापळा ठेवण्यात आला आहे आणि अॅनाकोंडा त्यामध्ये अडकला आहे. अॅनाकोंडा ड्रममधून बाहेर पडण्यासाठी कित्येक तास धडपड करत आहे. पण त्याला ते जमत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं तो आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मोठा अ‍ॅनाकोंडा चिखलाच्या तलावाच्या काठावर निळ्या रंगाच्या ड्रममध्ये अडकलेला दिसत आहे. या अ‍ॅनाकोंडची लांबी सुमारे 50 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. कोंबडीचोराला पकडण्यासाठी हा ट्रॅप लावल्याचं कॅप्शनमध्ये युझरनं व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा प्रत्यक्षात खरा नसून तो एडीट करण्यात आला आहे. हा अॅनाकोंडा नसून एक छोटा साप आहे. या व्हिडीओला एडीट करण्यात आलं असून त्याला मोठं केलं आहे. साप ड्रमच्या पलिकडच्या टोकाला अडकल्याचं दिसत आहे. याआधी असाच एका सापाचा व्हिडीओ एडीट करण्यात आला होता. 30 फूट लांब सापानं नदी पार केल्याचा दावा त्या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तो व्हिडीओ एडीट करण्यात आला होता. त्याला इफेक्ट देऊन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: