मराठी बातम्या /बातम्या /Viral /बाबो! 3 किलोचा बर्गर 4 मिनिटात केला फस्त; VIDEO पाहून हैराण व्हाल

बाबो! 3 किलोचा बर्गर 4 मिनिटात केला फस्त; VIDEO पाहून हैराण व्हाल

4 मिनिटात हा इतका मोठा बर्गर खाऊन या तरुणाने रेकॉर्ड तोडला आहे.

4 मिनिटात हा इतका मोठा बर्गर खाऊन या तरुणाने रेकॉर्ड तोडला आहे.

4 मिनिटात हा इतका मोठा बर्गर खाऊन या तरुणाने रेकॉर्ड तोडला आहे.

जेव्हा भूक लागते तेव्हा आपण दाबून जेवतो. हा..त्यातही जे डायटिंग करतात त्यांच्यावर निर्बंध येत असले तरी अनेकांना भरपेट खाल्यानंतर जो आनंद मिळतो तर सर्वसाधारणपणे कधीच मिळत नाही. मात्र काही लोक असे असतात ज्यांना खाण्यासोबतच असं काही तरी वेगळच करण्याचं वेड असतं. ते लोक भरपूर अन्न काही मिनिटात संपवू शकतात. अशा लोकांची सर्वत्र मोठी चर्चा होते. अनेक ठिकाणी तर अशा स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. आता आपण ज्या व्यक्ती बद्दल बोलत आहे ती व्यक्ती अवघ्या 4 मिनिटात बेकनचे 40 स्लाइस, 8.5 पॅटी आणि पनीरचे 16 स्लाइसने तयार केेलेला 20,000 कॅलरीचा बर्गर सहजपणे खाऊ शकतो.

जर एखादी व्यक्ती इतक्या कमी वेळात इतके पदार्थ खात असेल तर त्या व्यक्तीची चर्चा तर होणारच ना. मॅट नावाच्या या व्यक्तीने बर्गर खाण्यासाठी अवघे 4 मिनिटं लावले आणि या बर्गरचं वजन 2.97 किलोग्राम होतं. मॅटने बर्गर खात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मॅटने हा रेकॉर्ड जुलै महिन्याच्या 26 तारखेला आपल्या नावावर केला होता. यापूर्वी ज्या व्यक्तीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे, त्या व्यक्तीने हा बर्गर खाण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ घेतला होता.

हे ही वाचा-स्टेजवर नवरीसमोर जात सासूने लगावले ठुमके; जबरदस्त डान्स पाहून सगळेच फिदा, VIDEO

" isDesktop="true" id="595672" >

( 3 kg burger eaten in just 4 minutes You will be annoyed by watching VIDEO )मॅटचा एक यूट्यूब चॅनल आहे. ज्यावर त्याला 14 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. मॅटचा हा अद्भूत कारनामा पाहिल्यानंतर अनेक जणं हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, इतका मोठा बर्गर संपविण्यासाठी त्याला किमान एक तास तरी लागेल.

First published:
top videos

    Tags: Viral video.