मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : किती गोड! 2 वर्षांच्या चिमुकलीचे हावभाव पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

VIDEO : किती गोड! 2 वर्षांच्या चिमुकलीचे हावभाव पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

चिमुकलीच्या या डान्सवर आणि हावभावावर अनेक युझर्स फिदा झाले आहेत.

चिमुकलीच्या या डान्सवर आणि हावभावावर अनेक युझर्स फिदा झाले आहेत.

चिमुकलीच्या या डान्सवर आणि हावभावावर अनेक युझर्स फिदा झाले आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 13 मार्च : सोशल मीडियावर टिक टॉकवरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन कऱणारे तर काही चांगले मेसेज देणारे असतात. नुकताच होळीचा सण पार पडला या सणाला एका चिमुकलीनं छान साडी नेसून डान्स केला आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांच्या या चिमुकलीनं युझर्स मन जिंकलं आहे. या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव फारच सुंदर आहेत. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. बंगाली गाण्यावर या मुलीनं डान्स केला आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांच्या या चिमुकलीनं आपला आनंद साजरा केला आहे. तिचा हा निरागसतेपणा आणि सुंदर डान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर या चिमुकलीच्या डान्सवर अनेक युझर्स फिदा झाले आहेत. 14 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये या चिमुकलीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. या व्हिडीओला 552 लोकांनी फेसबुकवर शेअर केलं आहे. 51 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत तर 198 लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता चिमुकलीनं लाल काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. हातात बांगड्या, कपाळावर कुंकु आणि डोक्यावर आणि गळ्यावर फुलांच्या माळा घातल्या आहेत. दोन्ही हातांनी हाळ्या वाजवून ही चिमुकली आपल्याच विश्वात छान रमली आहे. बंगाली गाण्यावर ह्या मुलीने जे एक्स्प्रेशन दिले आहेत त्यावर युझर्स घायाळ झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्याही तोंडातून किती गोड! असे उद्गार आल्याशिवाय राहात नाहीत. हे वाचा-धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा हे वाचा-पिल्लासाठी इवलासा जीव असलेल्या खारीनं कोब्य्राशी घेतला पंगा, पाहा VIDEO
First published:

पुढील बातम्या