मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Viral : परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं अस्सं उत्तर; टीचरला सहन झाला नाही धक्का, थेट कोमात गेले!

Viral : परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं अस्सं उत्तर; टीचरला सहन झाला नाही धक्का, थेट कोमात गेले!

विद्यार्थ्याने आपल्या उत्तर पत्रिकेत (Viral Answer of Student) अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सामान्यपणे आपण विचारही करू शकत नाही.

विद्यार्थ्याने आपल्या उत्तर पत्रिकेत (Viral Answer of Student) अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सामान्यपणे आपण विचारही करू शकत नाही.

विद्यार्थ्याने आपल्या उत्तर पत्रिकेत (Viral Answer of Student) अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सामान्यपणे आपण विचारही करू शकत नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

Viral : परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं अस्सं उत्तर; टीचरला सहन झाला नाही धक्का, थेट कोमात!Viral News : शाळा-कॉलेजमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. काही अभ्यासू असतात तर काही विद्यार्थ्यांचं शाळेय जीवन मस्ती आणि खोड्या काढण्यातच निघून जातं. मात्र अभ्यासात मन न लागणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही तितक्याच भयंकर असू शकतात. याच एक उदाहरण समोर आलं आहे. अशाच एका विद्यार्थ्याची परीक्षेतील उत्तर पत्रिका (Test Sheet gone Viral) सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (Viral copy of Student). जर तुम्हाला या उत्तर पत्रिकेत काय लिहिलंय हे कळालं तर तुम्ही दिवसभर हसत राहाल. (Viral Answer Sheet)

विद्यार्थ्याने आपल्या उत्तर पत्रिकेत (Viral Answer of Student) अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सामान्यपणे आपण विचारही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही उत्तर पत्रिका वाचाल तर वाटेल की तसं प्रश्नाचं उत्तर बरोबरच आहे. या उत्तराचं वैशिष्ट्य म्हणजे ते जेथून सुरू होतं, तेथेच येऊन संपतं.

हे ही वाचा-VIDEO : चिमुरड्याने सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की डोळ्यात पाणीचं येईल

भाक्रा नांगल धरण ते विश्व युद्धापर्यंत..

इंस्टाग्राम (Instagram)वर ही उत्तर पत्रिका fun ki life नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. पाहताना तर असं वाटतं की, प्रश्न भाक्रा धरणाविषयी विचारण्यात आला होता. विद्यार्थी जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यास सुरुवात करतो तेव्हा लिहितो की, हे धरण सतलग नदीवर बांधण्यात आलं आहे. जसं जसं पुढे जातो. यात सरदार पटेल, टाटा, पंडित जवाहर लाल नेहमी, गुलाबाची शेती, साखर, लंडन, जर्मनी आणि विश्व युद्धापर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे इतकं सगळ सांगितल्यानंतर पुन्हा विद्यार्थी पंजाब आणि सतलज नदीवरुन धरणापर्यंत पोहोचतो. आता या विद्यार्थ्यात टॅलेंट नाही असं तर म्हणू शकणार नाही. (Viral student wrote answer in the exam The teacher could not bear the shock went straight into a coma)

View this post on Instagram

A post shared by fun_ki_life (@fun_ki_life)

उत्तर पत्रिका पाहून शिक्षक कोमामध्ये

अशी कॉपी चेक करण्यासाठी ज्या कोणत्या शिक्षकाला मिळेल तो कोमामध्ये जाण्याशिवाय आणखी काय करू शकतो. नंबरच्या पुढे शिक्षकाने विद्यार्थ्याला 10 पैकी शून्य मार्क दिले आहेत. याशिवाय त्याने उत्तर पत्रिकेवर एक कमेंटही लिहिली आहे...टीचर कोमामध्ये आहे...आता कोणीही एकाच पानावर इतिहास, भूगोल, कला, साहित्य सर्व काही पाहायला मिळालं तर शिक्षक कसा काय सहन करू शकेल. लोकांनी या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या विद्यार्थ्याचे चरण स्पर्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. तर काही म्हणाले की, विद्यार्थ्याला 21 तोफांनी सलामी द्यायला हवी.

First published:

Tags: Instagram post, Teacher, Viral post