मराठी बातम्या /बातम्या /Viral /नव्या वर्षात माणुसकीचं मोठं उदाहरण! चष्मासाठी गरजूला दिले 500 डॉलर

नव्या वर्षात माणुसकीचं मोठं उदाहरण! चष्मासाठी गरजूला दिले 500 डॉलर

एवढं करून तो फक्त 11 डॉलर जमा करू शकला. यातून त्याच्या गरजेच्या वस्तू तो कशाबशा खरेदी करू शकत होता.

एवढं करून तो फक्त 11 डॉलर जमा करू शकला. यातून त्याच्या गरजेच्या वस्तू तो कशाबशा खरेदी करू शकत होता.

एवढं करून तो फक्त 11 डॉलर जमा करू शकला. यातून त्याच्या गरजेच्या वस्तू तो कशाबशा खरेदी करू शकत होता.

    नवी दिल्ली, 02 जानेवारी : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तो त्यांचा कसा सामना करतो हे महत्त्वाचं असतं. कोरोनाच्या काळात तर गाठीशी पैसे असलेल्या अनेकांना हादरवून टाकलं तर मग गरिबांची काय कथा? पण जसे गरिबी, भूक ही संकटं माणसावर येतात तसंच त्यांना मदत करणारेही लाखो हात समाजातून पुढे सरसावतात. अनेकदा ते अनामिकपणे मदत करून नामानिराळे राहतात.

    अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातही नुकतीच अशी घटना घडली. एका निरश्रित व्यक्तीला नवा चष्मा तयार करण्यासाठी 150 डॉलरची आवश्यकता होती. तो घरांच्या, दुकानांच्या काचा पुसून देण्याचं काम करायला पण त्याला एका काचेला 1 डॉलर मिळायचा. एवढं करून तो फक्त 11 डॉलर जमा करू शकला. यातून त्याच्या गरजेच्या वस्तू तो कशाबशा खरेदी करू शकत होता. एका किराणा मालाच्या दुकानात या निरश्रिताने आपली कहाणी एका अनामिक व्यक्तीला सांगितली. त्या अनामि व्यक्तीचं हृदय स्रवलं, डोळे पाणावले आणि त्याने त्या निरश्रितासाठी दुकानाच्या काउंटरवर 500 डॉलर दिले. हे पाहून निरश्रिताने त्या अनामिकाला घट्ट मिठी मारून त्याचे धन्यवाद दिले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून त्यात तुम्हाला या निरश्रिताच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसतो. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

    अनेक नेटिझन्सनी या अनामिक दात्यांचं खूप कौतुक केलं आहे. एकानी म्हटलंय, ‘OMG गरीबाला मदतत करणाऱ्या त्या माणसाला मनापासून आशीर्वाद.’ एकानी तर लिहिलंय की हा व्हिडिओ पाहून त्याला रडू कोसळलं.

    नेटवर असे अनेक व्हिडिओ येत असतात आणि ते व्हायरलही होत असतात. अमेरिकेतील ओहायोमध्ये एका व्यक्तीने रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचाऱ्यांना मिळून 5600 डॉलरची टिप दिल्याचा व्हिडिओ पण नेटवर व्हायरल झाला होता. कोरोना काळात रेस्टॉरंटच्या मालकाला त्याच्या नोकरांना पूर्ण पगार देणं शक्य नव्हतं. त्यामुळे या कामगारांना ख्रिसमससाठी काही वस्तू खरेदी करणंही शक्य होणार नव्हतं. पण या माणसाने एवढी मोठी टिप दिली की रेस्टॉरंटमधील 28 कामगारां ना प्रत्येकी 200 डॉलर मिळाले त्यामुळे त्यांनी ख्रिसमस ट्री आणि इतर वस्तू विकत घेता आल्या. या रेस्टॉरंटचा मालक आणि शेफ मौसा साल्लोख यांनी सोशल मीडियावर या अनामिकाला धन्यवाद देताना लिहिलं, ‘ तुमचं रेस्टॉरंट हे जणू तुमचं कुटुंबच झालेलं असतं. प्रत्येकच जण दुसऱ्याचा विचार करतो. मी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी बराच काळ किचनच्या बाहेर थांबायचो. ख्रिसमस ट्रीच्या खाली कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी गिफ्ट ठेवत होतो. पण तुम्ही एक मोठी भेट आम्हाला दिली आहे.’ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी मदत करूनही त्या माणसाने आपलं नाव जाहीर करण्यास नकार दिला.

    नोव्हेंबर 2020 मध्ये क्लिव्हलँडमध्ये एका माणसाने केवळ एका बियर खरेदीनंतर 3000 रुपयांची टिप बारमध्ये ठेवली होती. त्यानेही मालकाला ती टिप सर्व कर्मचाऱ्यांना वाटायला सांगितलं होतं.

    First published:
    top videos

      Tags: Photo viral