Elec-widget

Viral झाली लग्नपत्रिका, लिहिलं 'अंबानींपेक्षा आम्ही कमी नाही'

Viral झाली लग्नपत्रिका, लिहिलं 'अंबानींपेक्षा आम्ही कमी नाही'

पत्रिकेच्या पहिल्या पानावर 'आम्ही किती खर्च केलाय हे तुम्हाला पत्रिकेवरूनच कळत असेल. आम्ही अंबानींपेक्षा कमी नाही' पत्रिकेवर लग्नाची तारीख 6 डिसेंबर लिहिली आहे.

  • Share this:

नुकतंच तुळशीचं लग्न झालं. आता लग्नाचा काळ सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार  नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनेक लग्नाचे मुहूर्त आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. ही पत्रिका  वाचल्यावर तुम्हालाही हसू येईल. सोशल मीडियावर हे निमंत्रण विनोदवीर अक्षर पाठकने शेअर केलं आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतचं ही प्रामाणिक लग्नपत्रिका असल्याचंही म्हटलं आहे. लग्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर 'अंबानींपेक्षा आम्ही कमी नाही' असं लिहिलं आहे. तर पत्रिकेच्या खाली, 'कृपया कोणतीही भेटवस्तू आणू नका. त्यापेक्षा फक्त कॅश द्या. आम्ही 18 ज्यूस मिक्सर ग्राइंडरचं काय करणार...' ही लग्नपत्रिका सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे.

पत्रिकेच्या पहिल्या पानावर 'आम्ही किती खर्च केलाय हे तुम्हाला पत्रिकेवरूनच कळत असेल. आम्ही अंबानींपेक्षा कमी नाही' पत्रिकेवर लग्नाची तारीख 6 डिसेंबर लिहिली आहे. यासोबतच हा दिवस फार शुभ आहे. यादिवशी 22 हजार लग्न आहेत आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये तासन् तास फसू शकता.'

पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर मजेशीर पद्धतीने रिसेप्शनचा पत्ता लिहिला आहे. यात लिहिले की, 'जर दीपिका- रणवीर सहा फंक्शन करू शकतात आणि प्रियांका- निक आठ फंक्शन करू शकतात तर आम्ही दोन तीन रिसेप्शन करुच. रिसेप्शनची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. पण आम्ही स्वतः 8.30 वाजता येऊ.'

शेवटच्या पानावर नकाशाच्या मदतीने लग्नाचं स्थळ दाखवण्यात आलं आहे. यावर त्यांनी लिहिले की, 'या नकाशाच्या भरवशावर राहू नका. रस्त्यात कोणाला तरी पत्ता विचारा.' अक्षर पाठकचं हे ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहे. अक्षरने 11 नोव्हेंबरला हे फोटो ट्विटरवर शेअर केले. आतापर्यंत 11 हजार लोकांनी हे ट्वीट लाइक केलं असून 3 हजारहून जास्त री-ट्वीट मिळाले आहेत.

लता मंगेशकरांना झाला निमोनिया, जाणून घ्या याचे लक्षण आणि उपाय

पाकिस्तान नाही तर हे देश आहेत संपण्याच्या मार्गावर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

ही आहे जगातील सर्वात महाग इमारत, किंमत 70 हजार कोटी रुपयांहूनही जास्त

...म्हणून हवामान बदललं तु्म्ही आजारी पडता

भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...