Home /News /viral /

वाघापासून कुत्र्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं केला इंडियन जुगाड, पाहा PHOTO

वाघापासून कुत्र्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं केला इंडियन जुगाड, पाहा PHOTO

जंगलात वाघापासून कुत्राला सर्वाधिक धोक असतो. त्याच सोबत माणसावर येणाऱ्या संकटाची चाहूलही कुत्रा देत असतो.

    मुंबई, 04 जुलै: कुत्रा हा माणसाचा सर्वात खास मित्र मानला जातो. जुन्या काळापासून हे पाहिले जात आहे की माणसासोबत कुत्राही राहातो. जंगलात वाघापासून कुत्राला सर्वाधिक धोक असतो. त्याच सोबत माणसावर येणाऱ्या संकटाची चाहूलही कुत्रा देत असतो. गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढत आहे.माणसं आणि प्राण्यांवर वाढत्या वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यापासून आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं खूप भन्नाट आयडिया केली आहे. कुत्राला वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी हा खास जुगाड निलेश मिश्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या व्यक्तीनं कुत्राच्या गळ्याला धारदार खिळ्यांसारख्या असलेला पट्टा का बांधला आहे. याचं कारण म्हणजे वन्य जीवांपासून त्यांच संरक्षण व्हाव म्हणून. जंगलात वन्यप्राणी सहसा मानेवर हल्ला करून प्राण्याला ठार करतात. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी गळ्यात हा पट्टा बांधला आहे. हे वाचा-VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि... हे वाचा-मालकीणीची अंतयात्रा पाहून अश्रू अनावर, भावुक झालेल्या श्वानानं काय केलं वाचा हा स्वसंरक्षणाचा उत्तम पर्याय असल्याचं अनेक युझर्सनी ट्वीटरवर म्हटलं आहे. या व्यक्तीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. आपल्यासोबत आलेल्या या मुक्या प्राण्यालाही सुरक्षित वाटावं आणि वाघ किंवा बिबट्यानं त्यावर हल्ला करू नये म्हणून हा जुगाड कऱण्यात आला आहे. एक युझरनं तर ही खूप जबरदस्त युक्ती असल्याचं म्हटलं आहे. सध्या या कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Himachal, Tiger attack, Viral photo

    पुढील बातम्या