Home /News /viral /

20 सेकंद एकाग्रतेनं बघा 'हा' फोटो, जर करु शकलात तर तुम्ही Genius

20 सेकंद एकाग्रतेनं बघा 'हा' फोटो, जर करु शकलात तर तुम्ही Genius

सोशल मीडियावरून अनेक गेम्स किंवा विविध टास्क किंवा चॅलेंजच्या बाबतीत पोस्ट व्हायरल होत असतात. आताही अशीच एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टबाबत भरपूर चर्चा होत आहे.

नवी दिल्ली, 17 मार्च: सोशल मीडिया हे फक्त संपर्क, संवादाचं माध्यम आता राहिलेलं नाही, तर ते एक मनोरंजन करणारं किंवा माहिती देणारंही माध्यम बनलं आहे. सोशल मीडियावरून अनेक गेम्स किंवा विविध टास्क किंवा चॅलेंजच्या बाबतीत पोस्ट व्हायरल होत असतात. आताही अशीच एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टबाबत भरपूर चर्चा होत आहे. या बद्दलचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे. ही पोस्ट एका चॅलेंजबाबत आहे. या पोस्टमधून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो म्हणजे एक आकृती आहे. ही आकृती आहे इल्युजनबद्दलची. मॅजिशियन आणि कंटेट क्रिएटर इव्हाननं ही ऑप्टिकल इल्युजनची इमेज सोशल मीडियावर शेअर केली आहे. या आकृतीकडे फक्त 20 सेकंद सलग पाहायचं इतकंच हे चॅलेंज आहे. आता तुम्हाला वाटेल त्यात काय! पण हे सोपं अजिबातच नाही. कारण हे चॅलेंज 99 टक्के लोक पूर्ण करू शकलेले नाहीत. सुरुवातीला अगदी इंटरेस्ट घेऊन या आकृतीकडे आपण बघायला सुरुवात करतो खरं. पण 10-15 सेकंदांमध्येच आपले डोळे मिटायला लागतात किंवा डोळ्यांमधून पाणी यायला लागतं. त्यामुळे साहजिकच या आकृतीवरून आपली नजर बाजूला जाते, पापण्या मिटल्या जातात. अशा प्रकारे चॅलेंज अपूर्णच राहतं. ज्यानं ही इमेज शेअर केली आहे त्या इव्हानला इंटरनेट विश्वात ‘द कार्ड गाय’ या नावाने ओळखलं जातं. इव्हान सोशल मीडियावर अशी अनेक चित्रविचित्र चॅलेंज शेअर करत असतो. पण या वेळेसच्या या चॅलेंजनं अनेकांच्या डोक्याचा भुगा केला आहे. जो फोटो इव्हाननं शेअर केला आहे त्यात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिसतात. या फोटोच्या मधोमध एक लाल रंगाचा डॉट म्हणजे ठिपका आहे. या ठिपक्याकडे सलग 20 सेकंद बघत राहणं हेच चॅलेंज आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिपक्याकडे एकटक बघताना एकदाही पापणी मिटायची नाही. अनेकजणांनी हे चॅलेंज पूर्ण करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला. पण पूर्ण करण्यात यशस्वी मात्र झाले नाहीत. या आकृतीकडे बघितल्यावर काहीजणांचं डोकं दुखायला सुरुवात होते. काहीजणांची चिडचिड होते. त्यामुळे आतापर्यंत 99 टक्के लोकांनी हे चॅलेंज पूर्ण केलेलं नाही. आता तुम्ही जर हे चॅलेंज पूर्ण करू शकलात तर तुम्ही नक्कीच जीनियस आहात. तर मग बघा बरं जमतंय का?
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Photo viral

पुढील बातम्या