मराठी बातम्या /बातम्या /Viral /'देशी बर्थडे पार्टी'; व्हायरल फोटो पाहून जुन्या आठवणींमध्ये रमले नेटकरी, आठवलं बालपण

'देशी बर्थडे पार्टी'; व्हायरल फोटो पाहून जुन्या आठवणींमध्ये रमले नेटकरी, आठवलं बालपण

साधेपणानं केक, फुगे आणि घरीच तयार केलेल्या पदार्थांसोबतची बर्थडे पार्टी बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाणारी असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत असून या फोटोनं नेटकऱ्यांना बालपणीच्या आठवणींमध्ये (Viral Photo of Birthday party) रमवलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 30 मे: लहानपणी एखाद्या मित्राचा किंवा शेजाऱ्याचा वाढदिवस असला की त्याच्या बर्थडे पार्टीसाठीच (Birthday Parties) अनेकजण आतुरतेनं वाट पाहात असतात. ही लहानपणीची एक गोड आठवणच असते. लॉकडाऊन (Lockdown) आणि कोरोनाच्या (Corona) आधीही अशा बर्थडे पार्टीजला आपण हजेरी लावायचो. अगदी साधेपणानं केक, फुगे आणि घरीच तयार केलेल्या पदार्थांसोबतची ही बर्थडे पार्टी बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाणारी असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत असून या फोटोनं नेटकऱ्यांना बालपणीच्या आठवणींमध्ये (Viral Photo of Birthday party) रमवलं आहे.

बर्थडे पार्टीमध्ये एका प्लेटमध्ये केक, घरीच बनवलेले चिप्स आणि समोसा; 90 च्या दशकातील बहुतेकांनी अशीच पार्टी इन्जॉय केली असेल. अगदी अशाच एका प्लेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे नेटकरी आठवणींमध्ये रमले आहेत.

आशिष नावाच्या एका युजरनं हा फोटो शेअर केला आहे. याला त्यानं "Flashbacks?" असं कॅप्शन दिलं आहे. वरती नमूद केलेल्या सर्व गोष्टी या प्लेटमध्ये ठेवलेल्या दिसत आहेत. तसंच यात एक चॉकलेटही दिसत आहे. या प्लेटमधील केक ब्लॅक फॉरेस्ट असून हा बहुतेक पार्टीमध्ये पाहायला मिळतो.

या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या फोटोसाठी युवकाचे आभार मानले आहेत. तर, एका युजरनं याला देसी बर्थडे पार्टी (Desi birthday party) म्हटलं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत बर्थडे पार्टीमधील आपले अनुभव शेअर केले आहेत. तर, काहींनी बर्थडे पार्टीमध्ये खट्टा-मीठा आणि पार्ले जीचं बिस्किटही स्पेशल मिल असल्याचं म्हटलं आहे. अनेकांना हा फोटो पाहून शेजाऱ्याच्या मुलाची बर्थडे पार्टी आठवली आहे. एकंदरीतच लॉकडाऊनच्या या काळात या फोटोनं सर्वांनाच जुन्या आठवणींमध्ये रमवलं आहे.

First published:

Tags: Photo viral, Viral photos