माकडानं दलदलीत अडकलेल्या तरुणाचं केलं रेस्क्यू ऑपरेशन, पाहा PHOTO

माकडानं दलदलीत अडकलेल्या तरुणाचं केलं रेस्क्यू ऑपरेशन, पाहा PHOTO

प्राण्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना जीवदान देण्यात आल्याचे अनेक प्रसंग बातम्या आपण ऐकतो मात्र चक्क माकडानं एका तरुणाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

09 फेब्रुवारी: पाण्यात अडकलेल्या किंवा संकटात असलेल्या प्राण्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना जीवदान देण्यात आल्याचे अनेक प्रसंग बातम्या आपण ऐकतो मात्र चक्क माकडानं एका तरुणाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. तुम्हाला आर्श्चय वाटतंय ना? पण हो. फेसबुकवर एक फोटो वायरल होत आहे. ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की माकडानं दलदलीत अडकलेल्या तरुणाला मदतीचा हात दिला आहे. कोणताही विचार न करता हे माकड मदतीसाठी पुढे धावत आलं. सोशल मीडियावर ही इमेज 6 फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आली होती. या फोटोला जवळपास 1.3 लोकांनी पाहिलं असून 412 युझर्सनी हा फोटो रिशेअर केला आहे.

इंडोनेशियात चिंपांझीच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या एका माणसानं हे दृश्य 8 डिसेंबर रोजी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. हा फोटो 6 फेब्रुवारीला सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या आला आणि वाऱ्याच्या वेगासारका हा फोटो व्हायरल झाला. या फोटोवर युझर्सनी तुफान कमेंट्स दिल्या आहेत आणि हा फोटो 400हून अधिक लोकांनी शेअरही केला आहे.

चिंपांझीने केलेली मदत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर काही युझर्सनी प्राण्यांमधलं प्रेम आणि माणुसकी असल्याचं सांगितलं तर काही युझर्सनी माणूस दिवसेंदिवस हिंस्र होत असल्याचंही म्हटलं आहे. असं दृश्यं सहसा पाहायला मिळत नाही. एका माकडानं माणसाचा दलदलीतून चक्क बाहेर काढल्याचं हे दृश्यं काळजाला भिडणारं असल्याचं युझर्सनी म्हटलं आहे.

हेही वाचा-शिकारी खुद शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला खाल्लं, पाहा थरारक VIDEO

हेही वाचा-Bikiniमध्ये फिरणाऱ्या महिलेसोबत पोलिसांचं गैरवर्तन, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2020 03:34 PM IST

ताज्या बातम्या