मुंबई : इंटरनेट हा विचित्र आणि धक्कादायक गोष्टींचा खजिना आहे, येथे कधी कोणती गोष्ट अचानक समोर येईल आणि ट्रेंड करेल याचा काहीच नेम नाही. इथे मनोरंजक व्हिडीओ पासून ते धोकादायक स्टंट आणि प्राण्यांपर्यंत बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात.
सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो एक साधा फोटो आहे, जो एक बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचा आहे. पण या फोटोला तुम्ही बारकाईने पाहाला तेव्हा तुम्हाला त्यामधील खरी गंमत कळेल. खरंतर या व्यक्तीच्या पाठी एक बाहूली किंवा डॉल बसली आहे. ही डॉल नुसतीच बसली नाहीय, तर तिला बेल्टने बांधून बसवण्यात आलं आहे.
भिंतीतून येत होता विचित्र आवाज, यामागचं गुढ उलगडलं तेव्हा कुटुंबीयांना बसला धक्का
या व्यक्तीला रस्त्यावरुन जाणारा जो तो पाहात आहे, तो आश्चर्य व्यक्त करत आहे. तेव्हा बाजूला असलेल्या एका व्यक्तीने याचा फोटो आपल्या कॅमेरात काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा फोटोपाहून लोक वेगवेगळ्या प्रकारचा विचार करु लागले आहेत. आता भारताती लोक फारच क्रिएटीव्ह आहेत, त्यामुळे कधी त्यांच्या डोक्यात काय येईल याचा काही नेम नाही.
One really sees some very random stuff on Delhi’s roads… pic.twitter.com/Dt2WBROIJg
— Kabir Taneja (@KabirTaneja) March 18, 2023
हा फोटोवर अनेकांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, या माणसाचं डोकं फिरलंय का? असं अनेकांचं म्हणणं आहे. पण कुणी याबद्दल अंधश्रद्धा व्यक्त केली आहे, तर अनेकांनी या फोटोला फक्त गंमतीनं घेतलं आहे.
एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये सुचवले की वडील आपल्या मुलीसाठी भेटवस्तू घेऊन जात आहेत किंवा त्यांच्या मुलीने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. काही लोकांनी परिस्थितीची खिल्ली उडवली आणि लिहिले, "चांगली गोष्ट आहे तिने बाईकवर सीटबेल्ट घातलं आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Viral, Viral photo