• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • 'त्या' व्यक्तीचा फोटो झळकला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण; पोलिसांनी केली अटक

'त्या' व्यक्तीचा फोटो झळकला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण; पोलिसांनी केली अटक

`न्यूयॉर्क डेली न्यूज` (New York Daily News) या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर या व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध होताच तो लोकल सेलिब्रिटी (Local Celebrity) बनला. प्रत्येक जण त्याला ओळखू लागला.

  • Share this:
न्यूयॉर्क, 06 ऑक्टोबर: सार्वजनिक ठिकाणी (Public Place) कोणीही मल किंवा मूत्रविसर्जन (Pee) करू नये यासाठी भारतात प्रबोधनात्मक मोहीम राबवली जात आहे. तरीदेखील काही जण रस्त्याच्या कडेला किंवा भिंतीवर मूत्रविसर्जन करताना दृष्टीस पडतात. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अशा व्यक्तींवर कारवाई होणं आवश्यक आहे. मात्र, हा प्रकार केवळ भारतातच होतो, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. न्यूयॉर्कमधली (New York) एक व्यक्ती टाइम्स स्क्वेअर सबवेच्या भिंतीवर लघवी करताना आढळून आली.  मात्र या प्रकारामुळे या व्यक्तीला अशी शिक्षा सुनावण्यात आली, की यानंतर पुन्हा कधीही ही व्यक्ती असं कृत्य करणार नाही. ही व्यक्ती लघवी करतानाचा फोटो शहरातल्या वृत्तपत्रात (News paper) पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आला. `न्यूयॉर्क डेली न्यूज` (New York Daily News) या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर या व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध होताच तो लोकल सेलिब्रिटी (Local Celebrity) बनला. प्रत्येक जण त्याला ओळखू लागला. यामुळे त्याला घराबाहेर पडणं मुश्किल झालं; मात्र एवढंच नव्हे, तर ही व्यक्ती खिशात लोडेड पिस्तुल (Gun) घेऊन वावरत होती. लघवी करण्याकरिता त्याने जेव्हा पँट खाली केली, तेव्हा चुकून पिस्तुलचा ट्रिगर दाबला गेला आणि त्याच्या पायाला गोळी लागली. या घटनेनंतर या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेही वाचा- भविष्याचा वेध, 'या' ठिकाणी चक्का तयार केलं जात आहे पाण्यावर तरंगणारं शहर! या व्यक्तीचं नाव शॉन सेंटिआगो असं असून, तो 39 वर्षांचा आहे. `सीबीएस न्यूयॉर्क` ने दिलेल्या वृत्तानुसार, शॉन टाइम्स स्क्वेअर सबवेच्या भिंतीवर मूत्रविसर्जन करताना आढळला. त्या वेळी त्याच्या खिशात असलेल्या पिस्तुलमधून गोळी सुटून तो जखमी झाला. ही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हे दृश्य पाहून आम्ही 1990च्या दशकात असल्याचं जाणवल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कारण त्या काळात सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य सर्रास केलं जाई; मात्र आजच्या काळात असं दृश्य पाहायला मिळेल, याची कल्पनाही केली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. हेही वाचा- Lights, camera, liftoff : अंतराळात झेपावले कलाकार; Space मध्ये पहिल्यांदाच Film shooting सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या या व्यक्तीस चांगलाच धडा शिकवण्यात आला. शहरातल्या प्रसिद्ध वृत्तपत्रानं या व्यक्तीचा फोटो पहिल्या पानावर प्रसिद्ध केला. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही व्यक्ती एका गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून, यापूर्वी अनेकदा त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आता या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघवी करणं. तसंच शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याला शिक्षा सुनावण्यात येईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. वृत्तपत्रात फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर शॉनला शहरातली लोक ओळखू लागले आहेत. त्यामुळे तो एक सेलिब्रिटी बनला आहे नि बाहेर तोंड दाखवणंही मुश्कील झालं आहे.
Published by:Pooja Vichare
First published: