मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काय सांगता! च्युइंगम चावून महिला दरमहा कमावते तब्बल 67 हजार; काम आहे फारच मजेशीर!

काय सांगता! च्युइंगम चावून महिला दरमहा कमावते तब्बल 67 हजार; काम आहे फारच मजेशीर!

Viral News: फक्त च्युइंगम चघळून एक महिला दरमहा 67 हजार रुपये कमावते असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरे आहे. जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण काय आहे?

Viral News: फक्त च्युइंगम चघळून एक महिला दरमहा 67 हजार रुपये कमावते असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरे आहे. जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण काय आहे?

Viral News: फक्त च्युइंगम चघळून एक महिला दरमहा 67 हजार रुपये कमावते असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरे आहे. जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण काय आहे?

बर्लिन, 29 जुलै : आजच्या जगात कोण कसे पैसे मिळवील, याचा खरंच काही अंदाज बांधता येत नाही. जगातली बेरोजगारी संपलेली नाही; पण काही जणांनी मात्र रोजगाराची अशी काही साधनं किंवा माध्यमं शोधून काढली आहेत, की त्याचा अंदाजच बांधणं शक्य नाही. अर्थात सोशल मीडिया हा त्यातला महत्त्वाचा दुवा आहे, ही गोष्टही खरीच. तरीही त्यामागच्या कल्पना किती तरी भन्नाट आणि वेगळ्या असतात. अशीच एक भन्नाट कल्पना म्हणजे च्युइंग-गम खाऊन पैसे मिळवणं. आता वाचून कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण मुळात च्युइंग-गम खाणं ही गोष्टच प्रामुख्याने वेळ जात नसेल तेव्हा टाइमपाससाठी केली जाते; पण जर्मनीतल्या (Julia from Germany) ज्युलिया नावाच्या महिलेबाबत मात्र ही गोष्ट खरी नाही. ती महिला दर महिन्याला च्युइंग-गम खाऊन तब्बल 67 हजार रुपयांची कमाई करते. ते कसं हे जाणून घेऊ या. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आता या महिलेच्या उत्पन्नाचं गणित जाणून घेऊ या. ही महिला एकाच वेळी तब्बल 30 च्युइंग-गम (Chewing Gum Videos) खाते. त्यापासून मोठा बबल तयार करते. त्या बबलचे व्हिडिओ तयार करते. त्या व्हिडिओ क्लिप्स (Video Clips) विकून तिला पैसे मिळतात. महिन्याला तिला च्युइंग-गम खरेदीसाठी फक्त 480 रुपये खर्च येतो आणि तिला त्यातून मिळतात तब्बल 67 हजार रुपये. ती मोठमोठे बबल्स (Chewing Gum Bubbles) बनवतानाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं. त्या क्लिप्सना मोठी मागणी आहे आणि त्या क्लिप्स खरेदी केल्या जातात. त्यामुळे तिला इतक्या प्रचंड प्रमाणात पैसे मिळतात. जंगलात लाकडं तोडायला गेली अन् झाली लाखोंची कमाई, एका गोष्टीने झाला चमत्कार! ज्युलियाने हे काम अगदी गमतीतून सुरू केलं होतं. तिच्या एका मित्राने तिला सांगितलं होतं, की ती याचे व्हिडिओ तयार करून विकू शकते. त्यानंतर तिने सहज करून पाहू असा विचार करून बबल्सचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला तर तिने केवळ त्याचे फोटोज शेअर करायला सुरुवात केली होती. त्या फोटोजना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिच्या कामाला प्रोत्साहन मिळालं. आता ती म्हणते, की तिचे फॅन्स तिला काही सजेशन्स देतात. त्यानुसार ती आपल्या कामात बदल करत जाते. त्यामुळे तिच्या व्हिडिओजना आणखी चांगला प्रतिसाद मिळतो. आता हे तिचं पार्ट टाइम काम राहिलेलं नाही. ती पूर्ण वेळ हे काम करते, यावरूनच तिला किती पैसे मिळतात, याचा अंदाज येऊ शकेल.
First published:

Tags: Social media

पुढील बातम्या