Viral: महाकाय अजगर, कोब्रासारख्या विषारी सापांचा सांभाळ करतात हे भिक्खू

Viral: महाकाय अजगर, कोब्रासारख्या विषारी सापांचा सांभाळ करतात हे भिक्खू

म्यानमारमधील( Myanmar) एका भिक्कूंनी (Bhikkhu) चक्क विषारी सापांचा सांभाळ केला आहे. या जगावेगळ्या भिक्कूची बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 डिसेंबर : प्राणीमात्रांवर प्रेम करणं हा मानवी स्वभाव आहे. सर्वच धर्माच्या ग्रंथामध्ये प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण दिली जाते. कुत्रा, मांजर, गाय यासारखे पाळीव प्राणी पाळणारे, त्यांचा पोटचा मुलासारखा सांभाळ करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला आहेत. या प्राणीमित्रांसाठी त्यांचे प्राणी हे केवळ प्रेम नाही तर अनेकदा अभिमानाची आणि हौसेची गोष्ट असते.

पाळीव प्राण्यांच्या ऐवजी अजगर, कोब्रा सारख्या विषारी प्राण्यांचा सांभाळ करण्याचा सहसा कुणीही विचार करत नाही. कुणी तसा विचार करू नये म्हणूनच कदाचित आपल्याकडे ‘सापाला दूध पाजू नये’ असा वाक्यप्रचार रुढ झाला असावा.

भारतामध्ये आणि विशेषत: मराठी भाषेत प्रचलित असलेला हा वाक्यप्रचार मान्यमारच्या (Myanmar) भिक्खूला (Bhikkhu) माहिती असण्याचं कारण नाही. त्यामुळेच ते कदाचित गेल्या अनेक वर्षांपासून विषारी सापांचा सांभाळ करत आहेत. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी केली असून ती आता चांगलीच व्हायरल झाली आहे.

भिलू विलेथा सिक्टा ( Wilatha) असे या विषारी सापांचा सांभाळ करणाऱ्या बौद्ध भिक्कूंचे नाव आहे. विषारी सापांना कुणी मारु नये किंवा त्यांची काळ्या बाजारात विक्री करु नये म्हणून ते त्यांचा सांभाळ करत आहेत.

विलेथा वयाच्या पाचव्या वर्षांपासून या सापांचा सांभाळ करत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मानवी वस्तीमध्ये सापडलेले विषारी सापांना अनेकदा जंगलात सोडण्यात येते. त्या सापांना कोणतीही इजा होणार नाही याची ते काळजी घेतात. एखादा जखमी साप जंगलात स्वतंत्रपणे संचार करण्यासाठी फिट झाल्याची खात्री पटत नाही तोपर्यंत विलेथा त्यांचा सांभाळ करतात. ‘वाईट प्रवृत्तीची लोकं सापांची काळेबाजारात विक्री करतात हे पाहून आपल्याला त्रास होतो’ असे विलेथा यांनी सांगितले आहे.

विषारी सापांना ठराविक मुदतीमध्ये जंगलात सोडणे हे म्यानमारच्या कायद्यामध्ये बंधनकारक आहे. साप दीर्घकाळ मानवी संपर्कात राहिले तर ते हिंसक होतात, असे वन्यजीव अभ्यासंकांचे मत आहे.

म्यानमार हे अवैध प्राणी विक्रीचे मोठे जागतिक केंद्र आहे. म्यानमारमधील प्राण्यांची चीन, थायलंड आणि अन्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

Published by: News18 Desk
First published: December 5, 2020, 10:22 PM IST
Tags: viral news

ताज्या बातम्या