मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाण्यात बुडणाऱ्या कुत्र्याला तो वाचवायला गेला आणि स्वत: त्याचा शिकार बनला; असं काय घडलं? वाचा

पाण्यात बुडणाऱ्या कुत्र्याला तो वाचवायला गेला आणि स्वत: त्याचा शिकार बनला; असं काय घडलं? वाचा

27 वर्षीय रीस टेलर जिममधून घरी परतत असताना त्याला कोणाचा तरी आवाज ऐकू आला. तेथे कुणीतरी बुडणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी मदतीसाठी ओरडत होते. तेव्हा त्याने कुत्र्याला वाचवण्याचे ठरवले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 05 सप्टेंबर : लोकांचं भलं करण्याच्या नादात अनेक लोकं आपलं स्वत:चं नुकसान करुन घेतात. याबाबत बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल किंवा याचा अनुभव तरी घेतलाच असेल. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. तिला दुसऱ्याला मदत करणं भलतंच महागात पडलं आहे. ज्याची शिक्षा तिला आता आयुष्यभरासाठी भोगावी लागू शकते.

एका तरुणाने एका कुत्र्याला नदीत बुडताना पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी लगेच पाण्यात उडी मारली. यादरम्यान, कुत्र्याने त्या वाचवणाऱ्या तरुणासोबत असं काही केलं, जे त्याला भलतंच महागात पडलं.

27 वर्षीय रीस टेलर जिममधून घरी परतत असताना त्याला कोणाचा तरी आवाज ऐकू आला. तेथे कुणीतरी बुडणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी मदतीसाठी ओरडत होते.

हे वाचा : रेस्टॉरंटमधील बाथरूम वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, हा फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

रीसने डेली मिररला सांगितले की, "मला त्या माणसाला प्लीज मदत करा, माझा कुत्रा बुडणार आहे असे म्हणताना मी ऐकले. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी पाहिले की माझी आई स्थानिक प्राण्यांची काळजी घेत असे. आमच्याकडे कुत्रे, मांजर, ससे, पाळीव कबूतर होते."

पुढे रीस म्हणाला की, ''म्हणून मला देखील प्राण्याविषयी प्रेम आहे. ज्यामुळे मी काहीही विचार न करता माझी बाईक थांबवली, माझे कपडे काढले आणि थेट नदीत उडी मारली. परंतू त्या घाबरलेल्या कुत्र्याने माझ्या चेहऱ्याचा चावा घेतला."

हे वाचा : Live शोमध्ये अँकरने गिळली माशी, ती १ सेकंद थांबली आणि... Video सोशल मीडियावर व्हायरल

ही घटना ब्रिटनमधील नॉर्विच यॉट स्टेशनवर बेंटले येथे घडली, येथे कुत्रा बोटीच्या बाजूला पाण्यात पडला होता. कुत्र्याला वाचवण्यासाठी रीसने आपले कपडे काढले आणि नदीत उडी मारली. परंतू त्याची रिसने खूप मोठी किंमत मोजली. या हल्ल्यानंतर, रीसला रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. तसे आता रिसची तब्येत सुधारत आहे.

First published:

Tags: Shocking news, Top trending, Viral news