Home /News /viral /

पत्नी म्हणून राहायचं असेल तर पूर्ण करावी लागेल ही अजब अट, नाहीतर मिळेल घटस्फोट

पत्नी म्हणून राहायचं असेल तर पूर्ण करावी लागेल ही अजब अट, नाहीतर मिळेल घटस्फोट

एका व्यक्तीने या नात्यात आणि महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाबाबत अशा अटी जोडल्या आहेत ज्या ऐकून सगळेच थक्क झाले.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी: एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. मुलाला जन्म देणं हा प्रत्येक स्त्रीसाठी जगातील सर्वात मोठा आनंद असतो. बरेच लोक याला सर्वात मोठं वरदान मानतात. पती-पत्नीच्या नात्याचा धागाही पुढे याच्याशी बांधला जातो. म्हणूनच असं म्हणतात की, मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट होतं. दोघांमधील प्रेम काळजी आणि जबाबदारीने पुढे जाते. पण एका व्यक्तीने या नात्यात आणि महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाबाबत अशा अटी जोडल्या आहेत ज्या ऐकून सगळेच थक्क झाले. पॉडकास्ट होस्ट (Podcast host) निक कॅसांता (Nick Casasanta) याने शोमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकल्यानंतर तो बहुतेक लोकांच्या तिरस्काराचा विषय बनला आहे. मुलाचा बाप झाल्याचा आनंद लुटण्याऐवजी मुलाच्या जन्माबरोबरच त्याची पत्नी आपल्या स्लिम फिगरकडे परत येते का याकडे निकचे लक्ष असेल. ती कुठे लठ्ठ तर होणार नाही? अशा प्रश्नांवर टिकटॉक युजर्सनी त्याला जोरदार फटकारले आहे. मात्र त्या व्यक्तीला याबद्दल कोणतीही खंत नाही. पत्नी लठ्ठ झाल्यानंतर तिला सोडून दिल्याचा पश्चात्ताप नसेल स्त्रीचे जीवनातील स्थान केवळ आकर्षणाने (Attraction) मर्यादित असते. हे आम्ही म्हणत नसून, यूट्यूबवरील एका कार्यक्रमादरम्यान निकने स्वतःच या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्या मते पत्नी किंवा जोडीदार जर लठ्ठ झाला तर त्याला ते अजिबात सहन होत नाही. बाळाला जन्म दिल्यामुळे त्याचं वजन वाढले असले तरी. जर त्याची पत्नी बाळाला जन्म दिल्यानंतर लठ्ठ झाली आणि लवकरच वजन कमी केले नाही तर तो तिला सोडून देईल आणि मला त्याचा काही पश्चात्ताप होणार नाही. नात्यात आकर्षण ही सर्वात महत्वाची गोष्ट नातेसंबंध, नातेसंबंध सांभाळणं या अशा विषयांवर बोलताना निकने आणखी एक आक्षेपार्ह विचार सर्वांसमोर ठेवला. निकच्या मते, जर त्याच्या दीर्घकाळाच्या जोडीदाराबद्दल त्याचे आकर्षण कमी होऊ लागले. तिला बघून माझ्यातील जर काही उत्साह किंवा जल्लोष थांबला तर त्याला अशा नात्यात राहायला आवडणार नाही. nick show या संभाषणाचा व्हिडिओ पॉडकास्टच्या टिकटॉक (Podcast’s TikTok page) पेजवर पोस्ट केल्यानंतर, जवळपास 2 मिलियन लोकांनी तो पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या. बहुतेक द्वेषयुक्त (Hate comments) कमेंट्स मिळाल्या, त्यानंतर त्या कमेंट्स काढून टाकाव्या लागल्या. नकारात्मक कमेंट्स काढून टाकल्या गेल्या आहेत असे यापूर्वी कधीही झाले नव्हते. यूजर्स निकच्या घाणेरड्या विचारसरणीमुळे संतप्त झाले आणि त्यांनी त्याला खूप वाईट म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Viral news

    पुढील बातम्या