मराठी बातम्या /बातम्या /Viral /गर्लफ्रेंडने चॉकलेट मागताच बॉयफ्रेंडने लढवली अशी शक्कल; VIRAL VIDEOची सोशल मीडियावर हवा

गर्लफ्रेंडने चॉकलेट मागताच बॉयफ्रेंडने लढवली अशी शक्कल; VIRAL VIDEOची सोशल मीडियावर हवा

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मजेदार आणि मनोरंजक असतात. तुम्ही सोशल मीडियावर प्रेयसी आणि प्रियकराशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यापैकी बहुतांश व्हिडिओ गमतीशीर असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई, 14 जानेवारी- सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मजेदार आणि मनोरंजक असतात. तुम्ही सोशल मीडियावर प्रेयसी आणि प्रियकराशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यापैकी बहुतांश व्हिडिओ गमतीशीर असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक प्रियकर आणि प्रेयसी मॉलमध्ये फिरायला आले. मॉलमधल्या फूड आणि ड्रिंक्स विभागात पोहोचताच प्रेयसी तिथलं चॉकलेट घेऊ लागते. तेव्हा प्रियकर तिच्या हातात भरपूर चॉकलेट्स देतो. एवढी चॉकलेट्स पाहून प्रेयसीला आनंद होतो. त्यानंतर ते दोघं सेल्फी काढतात. सेल्फी काढल्यानंतर प्रियकराच्या मनातला विचार अचानक बदलताना दिसतो. यानंतर प्रियकर जे कृत्य करतो, ते पाहिल्यानंतर कोणालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  प्रेमात पडल्यानंतर प्रेयसी आणि प्रियकर एकमेकांना चंद्र-तारे तोडून आणण्याचं वचन देतात. दोघं एकमेकांची खूप काळजी घेतात. यात प्रियकर आघाडीवर असतो. आपल्या प्रेयसीला काही कमी पडणार नाही, ती नाराज होणार नाही याची तो काळजी घेतो. तिला महागड्या भेटवस्तू देतो, फिरायला घेऊन जातो. प्रेयसीनं एखादी वस्तू मागितली तर प्रियकर क्षणाचाही विलंब न करता ती आणून देतो. अर्थात या गोष्टी आपण बऱ्याचदा पाहतो, अनुभवतो; पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल असलेल्या एका व्हिडिओत काहीसा वेगळा प्रसंग पाहायला मिळतो.

  (हे वाचा: बाथरूममध्ये उभं राहून किचनमध्ये करू शकता स्वयंपाक, हा नॅनो फ्लॅट एकदा बघाच)

  या व्हिडिओत प्रियकराचं कृत्य पाहून प्रेयसीला धक्का बसल्याचं दिसतं; पण हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवरच्या funtaap नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यातला प्रसंग प्रँक वाटतो. या व्हिडिओला कमी वेळात भरपूर लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडिओवर आवर्जून कमेंट्स करत आहेत.

  या व्हायरल व्हिडिओत असं दिसतं, की एक प्रियकर आणि त्याची प्रेयसी मॉलमध्ये फिरायला येतात. तिथं ते फूड आणि कोल्ड्रिंक्स विभागात पोहोचतात. त्या वेळी प्रेयसी तिथलं चॉकलेट घेते. त्याचवेळी तिचा प्रियकर तिच्या हातात एकाऐवजी भरपूर चॉकलेट्स देतो. भरपूर चॉकलेट्स दिल्यानंतर प्रियकर खिशातून मोबाइल काढून दोघांचा सेल्फी घेतो. भरपूर चॉकलेट मिळाल्याने प्रेयसी मनोमन खूश होते; पण फोटो काढल्यानंतर प्रियकर तिच्या हातातली सर्व चॉकलेट्स हिसकावून घेतो आणि परत रॅकमध्ये ठेवून देतो. प्रियकराचं हे कृत्य लक्षात येण्यापूर्वीच तो तिच्या हातात एक लहान चॉकलेट देतो. हा प्रकार पाहून प्रेयसीला आश्चर्याचा धक्का बसताना दिसतो. या व्हिडिओतला हा मजेशीर प्रसंग नेटकऱ्यांचं काही क्षण मनोरंजन करताना दिसतो.

  First published:
  top videos

   Tags: Lokmat news 18, Video viral, Viral news