पॅरीस, 08 सप्टेंबर : फ्रान्समधील डोर्डोग्ने नावाच्या व्यक्तीने एका माशीला मारताना स्वतःच्या घराचे मोठे नुकसान करून घेतल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने आपल्या घरातील एका माशीला इलेक्ट्रिक रॅकेटच्या मदतीने मारण्याचा प्रयत्न केला असता घरातील किचन आणि छताचे आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक वृत्तसंस्था सुद ओवेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती घरातील किचनमध्ये जेवण करण्यासाठी गेली असता घरातील माशीच्या आवाजाने त्याला त्रास जाणवायला लागल्यानंतर त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने या माशीला मारण्यासाठी इलेक्ट्रिक रॅकेट घेतले. मात्र त्याच्या घरातील गॅस लिकेज असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने माशीला मारण्याचा प्रयत्न केला असताना ज्यावेळी हे रॅकेट गॅसच्या संपर्कात आले असता मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये हा व्यक्ती वाचला मात्र त्याच्या घराचे यामध्ये मोठे नुकसान झाले. फ्रान्सच्या परकौल-चेनौड या गावातील त्याच्या घराचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या हाताला देखील किरकोळ जखम झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वाचा-शिकार करण्यासाठी आलेल्या मांजरीला सरड्यानं पळवून लावलं, पाहा मजेशीर VIDEO
या घटनेनंतर हा व्यक्ती एका स्थानिक शिबिरात दाखल झाला असून त्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले असून यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मजेदार गोष्ट म्हणजे हे समजलेले नाही की, ज्या माशीमुळे हे प्रकरण घडले आहे ती यामधून सुरक्षित बाहेर पडली आहे की नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना इंग्लंडच्या साऊथ यॉर्कशायर येथे घडली होती. येथील अल्बर्ट एनड्रयू नावाच्या एका व्यक्तीच्या देखील घराला अशाच पद्धतीने आग लागली होती. या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी आपले घर मेणबत्त्यांनी आणि फुग्यांनी सजवून ठेवले होते मात्र ज्यावेळी तो आपल्या गर्लफ्रेंडला आणण्यासाठी घराच्या बाहेर पडला त्यावेळी घराला आग लागली.
वाचा-आधी चोरला 45 हजारांचा फोन, वापरता आला नाही म्हणून मालकालाच घरी बोलवलं
मात्र यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात त्याचे कष्ट वायला गेले नाहीत तर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला होकार देखील दिला. त्यामुळे त्याने केलेल्या कष्टाचे चीज देखील झाले.