वॉश्गिंटन, 16 ऑगस्ट : आपण सोर्ट शूज घ्यायचे म्हटलं तरी किंमतीमध्ये घासाघिस करतो. पण 35 वर्ष जुने असलेले स्पोर्ट शूज 4.60 कोटींना विकल्याची माहिती समोर आली आहे. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. आता शूजवर एवढे पैसे कोण खर्च करतं असा लगेच प्रश्नही पडेल. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घ्या.
प्रसिद्ध बास्केटबॉलपटूचे हे शूज आहेत. अमेरिकेतील ड्रीम टीमचा भाग असलेल्या मायकल जॉर्डन याचे हे शूट आहेत. हे स्नीकर्स आहेत. हे शूज तब्बल 6 लाख 15 हजार डॉलर किमतीला विकले गेले आहेत. याआधीही अशा प्रकारे एका बास्केटबॉलपटूचे शूट विक्रमी किमतीला विकले गेले होते. त्याचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक किंमतीला हे शूज विकले गेल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
हे शूज 'एयर जॉर्डन 1' चे आहेत, शिकागो बुल्स स्टार जॉर्डनने 1985 मध्ये एका सामन्यात हे घातले होते. त्यावेळी इटलीमध्ये सामना खेळला गेला होता. या सामन्यात जॉर्डनने बॉलला इतका जोरात फेकला होता की बॅकबोर्डची काच फुटली होती. हे शूज घालून जॉर्डन यांनी सामन्यात 30 गुण टीमला मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांच्या शूटजी क्रेझ आणि चर्चा तर सगळीकडेच होती.
एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार जॉर्डन यांच्याकडे एकेकाही खूप सुंदर शूजचं कलेक्शन होतं. 14 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 9 शूजचा लिलाव केला. त्यापैकी हे सर्वात जास्त किंमतीला विकले गेले आहेत. जॉर्डनला मिळालेल्या किंमतीमधील 10 कोटी रुपये संस्थांना मदत म्हणून देणार आहे.