मुंबई, 23 जुलै: स्वत:चे फोटो काढणं कुणाला आवडत नाही. बऱ्याचदा फोटोमध्ये साम्य येऊ नये म्हणून वेगवेगळे प्रयोगही केले जातात. असा एक फोटोशूट दरम्यान केलेला प्रयोग महिलेच्या जीवावर येता येता वाचला आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
आपले व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्यासाठी बऱ्याचदा हटके कहितरी करण्याचा नाद आपल्याला नडतो असंच या महिलेसोबत घडलं आहे. हत्तीच्या सोंडेवर बसून फोटोशूट करण्याची कल्पना एका महिलेच्या डोक्यात आली. ही महिला त्यासाठी हत्तीच्या सोंडेवर चढून बसली देखील मात्र पुढे असं काही घडलं की जे पाहून काळजाचा ठोका चुकतो.
— ಪೋಲೀಸನಮಗಳು Shubha (@shubhamurty0509) July 21, 2020
हत्तीच्या सोंडेवर महिलेचं वजन कदाचित जास्त झालं असावं कारण हत्तीनं या महिलेला अगदी फुटबॉलसारखं फेकून दिलं. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. महिलेला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटो काढण्याचा शौक चांगलाच महागात पडला.
या व्हिडीओमध्ये सगळ्यात सुंदर काय आहे महिला, हत्ती की घडलेला प्रसंग? असं कॅप्शन देऊन IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओला साडेआठ हजारहून अधिक लोकांनी पाहिलं असून 602 लोकांनी लाईक तर 100 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोशूटचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.