बिहार, 04 फेब्रुवारी: बिहारमधील (Bihar) सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) (Janata Dal United) च्या आमदाराचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, आमदार बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood actor Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Actress Deepika Padukone) यांच्या ये जवानी है दिवानी (Yeh Jawani Hai Deewani) या सिनेमातील दिल्ली वाली गर्लफ्रेंड या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ एका लग्न समारंभाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूर विधानसभा मतदारसंघातील (JDU) आमदार गोपाल मंडल कुर्ता पायजमा घातलेले दिसत आहेत. त्याच्या डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर आहे. ते गाण्यावर नाचत आहेत. त्यांच्यासोबत आमदारांचे समर्थकही मंचावर नाचताना दिसत आहेत. याआधीही गोपाल मंडल यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा ते एका डान्सरसोबत डान्स करताना दिसले होते.
काही दिवसांपूर्वी पटना ते राजधानी दिल्ली या तेजस ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान ते अंडर गारमेंट्समध्ये प्रवास करताना दिसले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावर बराच गदारोळ झाला होता, तेव्हा पोटात दुखत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
वाह क्या डांस है!!! भई जेडीयू विधायक गोपाल मंडल जी गज़ब का डांस करते है। pic.twitter.com/jMsro3XMHb
— Vini J (@Vini_J26) February 3, 2022
याशिवाय मे 2021 मध्ये जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती, तेव्हा ते त्यांच्या कारसह कंटेनमेंट झोनचे बॅरिकेडिंग तोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
''बनावट दारू पिऊन लोक मरत आहेत हे चांगले आहे, लोकसंख्या कमी होईल''
नुकतेच बिहारमधील विषारी दारूच्या आहारी गेलेल्या लोकांबद्दल गोपाल मंडल यांनी अजब विधान केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती.
गोपाल मंडल म्हणाले होते की, मुख्यमंत्री नितीशकुमार नकार देत आहेत तरी मग तुम्ही दारू का पितात? नितीश कुमार यांनी आधीच म्हटलं आहे की, तुम्ही प्याल तर मराल. लोकं का पितात, मरायचं तर जागा रिकामीच असायला हवी. ते असेच मरत राहिले तर लोकसंख्या कमी होईल. बॉर्डर सील केल्या आहेत, त्यामुळे कमी दारू येत आहे. शेतातल्या रस्त्यातून दारु आणली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Bollywood, Deepika padukone, Ranbir kapoor, Social media viral, Video viral