न्यूयॉर्क, 25 ऑक्टोबर : सोन्या चांदीपेक्षाही महाग आहे तो हिरा आणि हिऱ्याचा मोह कुणाला नाही. आतापर्यंत चोरानं हिरा लंपास केल्याचं पाहिलं ऐकलं असेल पण हिरा चोरण्याचा मोह तर चिमुकल्या मुंगीलाही आवरला नाही. ही मुंगी चक्क हिरा चोरताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ऐकल्यावर एक क्षण विश्वास बसणार नाही पण असा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या आहेत.
हिरा चोरून ही मुंगी जगातली सर्वात श्रीमंत मुंगी झाली आहे. साधारण मुंगी साखर किंवा खाण्याचा पदार्थांसाठी किंवा अगदीच गारव्यासाठी येते असं पाहिलं आहे. पण श्रीमंती आणि हिऱ्याचा मोह हा मुंगीला देखील आवारला नाही. या व्हिडीओमध्ये मुंगी हिरा घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. न्यूयॉर्क पोस्टनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अधिकाऱ्यांनी या मुंगीला अटक केली का? मुंगीकडचा हिरा मालकाला परत मिळाला का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे वाचा-बापरे! चोरांनी चोरला सर्वात महागडा सरडा, संपर्ण शहराची पोलीस मागे
या व्हिडीओवर अनेक युझर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. आता मुंगीही विश्वास ठेवण्यालायक राहिली नाही. तर दुसऱ्या युझरने म्हटलं आहे की हिरा चोरला कुणी दुसऱ्यानं असेल पण नाव मात्र मुंगीच आलं कारण मुंगीला अडकवण्याचा डाव असावा. तर तिसरा युझर म्हणतो की या मुंगीला ट्रेन करण्यात आलं आहे. तर एका युझरने मुंगी हिऱ्याची चोरी का करेल असा सवाल उपस्थित केला आहे.
काही जणांनी ही मुंगी आपल्या पार्टनरसाठी रिंग तयार करायची असल्यानं हिरा चोरी करत असल्याचंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. एका अहवालात म्हटल्याप्रमाणे मुंगीमध्ये कायम आपल्या वजनाच्या 50 पट अधिक वजन उचलण्याची ताकद असते. या मुंगीने हिरा का चोरला असावा याची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा सध्या सुरू आहे. या मुंगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.