Home /News /viral /

VIDEO - चिमुकलीला माकडाने फरफटत नेलं आणि...; अंगावर काटा आणणारं भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - चिमुकलीला माकडाने फरफटत नेलं आणि...; अंगावर काटा आणणारं भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद

माकडाने चिमुकलीवर केलेला भयंकर हल्ला कॅमेऱ्यात कैद.

    बीजिंग, 12 मे : माकडांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. माकड किती खट्ट्याळ, खोडकर असतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. गावात किंवा एखाद्या पर्यटन ठिकाणी तुम्ही याचा अनुभव घेतलाच असेल. माणसांना माकडं खूप त्रास देतात. माणसांची नक्कल करता करता त्यांच्या हातातील वस्तूही हिसकावून नेतात. अशावेळी प्रतिकार केल्यास माकडं माणसांवर हल्ला करताना दिसतात (Monkey attack video). अशाच एका माकडाने चिमुकलीवर केलेल्या भयंकर हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहूनच धडकी भरेल (Monkey attack on child). भटक्या श्वानं हल्ला करतात तसं या माकडाने चिमुरडीवर हल्ला केला आहे. खेळणाऱ्या या चिमुकलीला माकडाने फरफटत नेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता रस्त्याच्या कडेला एक मुलगी एकटीच खेळताना दिसते आहे. तिच्या मागून एक माकड येतं. माकड इकडेतिकडे पाहतं आणि हळूहळू त्या चिमुकलीजवळ जातं. मुलीवर उडी मारत हल्ला करतं. तिचे केस आपल्या दोन्ही हातात धरतं आणि तिला फरफटत घेऊन जातं.  तिथंच एक व्यक्ती उभी आहे. माकडाने मुलीवर हल्ला करून तिला नेताच ती व्यक्ती त्या माकडाच्या मागे पळते. द सनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना चीनमधील आहे. मुलीचं नशीब चांगलं म्हणून ती बचावली आहे. खतरनाक माकडापासून तिचा जीव वाचला आहे. अशी माहिती द सनने आपल्या वृत्तात दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या