मराठी बातम्या /बातम्या /Viral /ही पंचविशीतली मुलगी करते सायकलवर योगा, VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

ही पंचविशीतली मुलगी करते सायकलवर योगा, VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Instagram वर अनेक VIDEO VIRAL होतात. पण या मुलीचे अचाट योगाचे प्रकार पाहून थक्क व्हाल

Instagram वर अनेक VIDEO VIRAL होतात. पण या मुलीचे अचाट योगाचे प्रकार पाहून थक्क व्हाल

Instagram वर अनेक VIDEO VIRAL होतात. पण या मुलीचे अचाट योगाचे प्रकार पाहून थक्क व्हाल

बर्लिन, 13 मार्च : सायकल चालवणं सगळ्यांनाच येतं. तसं पाहता सायकल चालवण्यात काही अवघड नाही. अनेकजण बालपणीच सायकल चालवायला शिकतात. (viral video)

मात्र तुम्ही कधी कुणाला चालत्या सायकलवर धोकादायक स्टंट्स करताना पाहिलं आहे का? किंवा चालत्या सायकलवर योगा करताना बघितलं आहे का? बाईकवरचे स्टंट आपण चित्रपटात आणि अनेकदा खऱ्या आयुष्यातही पाहिलेले असतात. (viral video of cycle yoga)

मात्र चालत्या सायकलवर स्टंट करणाऱ्या कुणाला तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ही मुलगी चक्क चालत्या सायकलवर योगा करते आहे. एवढंच नाही तर ती चालत्या सायकलवर खूप सारे धोकादायक स्टंट्ससुद्धा करते. (German girl cycle yoga stunt video)

हे व्हिडिओ पाहून अनेकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. या मुलीचं वय 26 वर्ष आहे. तिनं आपल्या सायकलिंगच्या कौशल्यानं सगळ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. (German girl cycle stunt viral video)

ती सायकलवर बॅलन्स बनवून योगा आणि विविध करामती करते. त्या पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (viola brand cycle stunt video)

हेही वाचा धोनी खिचडी, कोहली खमण अन् बरंच काही! क्रिकेट रसिक खवय्यांसाठी 5 फूट लांब थाळी

या मुलीचं नाव आहे व्हायोला ब्रँड. ती जर्मनीत राहते. व्हायोलानं वयाच्या सहाव्या वर्षापासूनच आर्टिस्टिक सायकलिंगचं प्रशिक्षण घेणं सुरू केलं होतं. आता ती आपलं शिक्षण पूर्ण करते आहे.

व्हायोला वयाच्या 15 व्या वर्षापासूनच जर्मन नॅशनल स्पोर्ट्स टीमचा भाग बनली. 2012 साली तिनं ज्युनियर युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली.

First published:
top videos

    Tags: Instagram, Stunt video, Viral video.