Home /News /viral /

अन् भरधाव जेसीबी रस्त्यावरच झाला आडवा, बोलेरो धडकली पण तरुण पॅन्ट झटकून घरी गेला, LIVE VIDEO

अन् भरधाव जेसीबी रस्त्यावरच झाला आडवा, बोलेरो धडकली पण तरुण पॅन्ट झटकून घरी गेला, LIVE VIDEO

जेव्हा जेसीबी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो गाडी येऊन धडकली, तेव्हा तिथेच रस्त्यावर एक तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला होता.

    आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 25 जुलै : 'देव तारी त्याला कोण मारी' असं उगाच म्हटलं जात नाही. कारण, याचा प्रत्यय एका भीषण अपघातातून आला आहे. समोरुन जेसीबी आडवा झाला आणि त्यावर भरधाव बलेरो येऊन धडकली पण या धडकेत एक दुचाकीस्वाराचा जीव अगदी थोडक्यात वाचला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बऱ्याच वेळा रस्त्यावर एखादा भीषण अपघात झाला किंवा खड्यात कुणी पडले असेल तर जेसीबीची मदत घेतली जाते. रस्त्याने जर जेसीबी मशीन जात असेल तर आपण चार हात लांब ठेवूनच गाडी चालवतो. पण,  महामार्गावरून भरधावपणे पुढे जाणाऱ्या जेसीबी वाहनावर चालकाचा अचानक ताबा सुटला. चालकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जेसीबी वाहन विरुद्ध दिशेने वळवले, त्याचवेळी समोरून एक भरधाव महिंद्रा बोलेरो आली आणि थेट जेसीबीवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, जेसीबीला बोलेरो धडकल्यानंतर तिला अक्षरश: बाजूला फेकले. पण, अपघाताचा हा थरार इथेच संपला नाही. जेव्हा जेसीबी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो गाडी येऊन धडकली, तेव्हा तिथेच  रस्त्यावर एक तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला होता. अगदी काही सेंकदात डोळ्यासमोर जेसीबी मशीन आडवी झाली, तिला पाहून पळावे असा विचार असतानाच समोरून बोलेरो येऊन धडकली.  व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, बोलेरो जेव्हा जेसीबीवर आदळली होती, तेव्हा ती मागे उलटली आणि दुचाकीला हलकीशी धडक दिली. यात हा तरुण दुचाकीसह दूर फेकला गेला. सुदैवाने यात त्याचा जीव थोडक्यात वाचला. बोलेरोला धडक दिल्यानंतर जेसीबी मशीन रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबले. यात फक्त बोलेरो गाडीचे नुकसान झाले. जेसीबीला तसेही काही झाले नसेल. मोबाईल फोनपेक्षाही स्वस्त Xiaomi ची स्कूटर, किती असेल किंमत? गंमत म्हणजे, आपण वाचलो हे या तरुणाला काही क्षण खरे वाटलेच नाही. आधी तो तिथून पळून जात होता. पण, दोन्ही गाड्या थांबल्याचं पाहून त्याने पॅन्टला लागलेली धूळ साफ करुन दुचाकी उचली आणि निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु, नेमका हा व्हिडिओ कुठला होता. याची माहिती अद्याप समोर आली नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे कुणी याची तक्रारही केली नसावी. पण, म्हणताना काळ आला होता पण वेळ आली नाही, ते या अपघातातून अधोरेखीत झाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Cctv

    पुढील बातम्या