सोशल व्हायरल : तुम्ही दुकानातून कच्च मांस खरेदी केलं किंवा ऑनलाइन मागवलं आणि हे मांस तुमच्या ताटात आल्यानंतर आपोआप हलू लागलं तर....? ही नक्कीच हैराण करणारी बाब आहे. असाच काहीसा प्रकार एका मुलीबाबत घडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका रेस्टॉरंटमधून एका मुलीने मांसची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यानंतर मुलीने मांस बाहेर काढले आणि शिजवण्यासाठी प्लेटवर ठेवले. अचानक प्लेटमध्ये ठेवलेला मांसाचा तुकडा हलू लागला. आणि काही वेळाने तो जोरात हलला आणि टेबलावरुन खाली पडला.
पाहता पाहता तो तुकडा हलू लागला आणि धपकन जमिनीवर पडला. मुलीने आपला मोबाइलवरुन हा प्रसंग शूट केला. यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1 कोटी 37 लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो बनावट असल्याचे सांगितले. दोऱ्याच्या मदतीने मांसाचा तुकडा खेचला जात असल्याची प्रतिक्रिया काहींनी केली आहे.
काही जण म्हणाले की, मांस ताजं होतं आणि त्याच्यात अजूनही जीव शिल्लक होता. याकारणाने ते मांस हलत होते. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने सांगितलं की, हे बेडकाचं मांस होतं, जे आशियातील जपान, चीनमध्ये खाल्लं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.