Home /News /viral /

VIDEO पैसे न दिल्याने स्ट्रेचर ओढण्यास वॉर्डबॉयचा नकार; आजोबांना ढकलत नेतंय ते 6 वर्षांचं लेकरू

VIDEO पैसे न दिल्याने स्ट्रेचर ओढण्यास वॉर्डबॉयचा नकार; आजोबांना ढकलत नेतंय ते 6 वर्षांचं लेकरू

तो 6 वर्षांचा नातू आपल्या आजोबांना ढकलत वॉर्डमध्ये घेऊन जात आहे, हा VIDEO मन पिळवटून टाकणारा आहे

    लखनऊ, 21 जुलै : कोरोनाच्या या संकटकाळात काहींनी माणुसकी दाखवत मदत केली मात्र काहींनी या महासाथीतही हात पुढे केला नाही. गेल्या काही महिन्यात दोन्ही पद्धतीच्या अनेक बातम्या समोर येत आहे. असाच एक मन हेलावणारा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयातील एका सहा वर्षांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना आईसह स्ट्रेचर ढकलत नेत असल्याचे व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रुग्णालयातील तो व्हिडीओ पाहून अनेकांनी राग व्यक्त केला आहे. ही घटना येथील देवरिया जिल्ह्यातील आहे. हे वाचा-मोठी बातमी! रेल्वे, बँकांनंतर आता या क्षेत्रातही होणार खासगीकरण या व्हिडीओमध्ये लहान मुलगा आणि त्याची आई आजोबांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले आहेत. यावेळी उपचारासाठीही त्यांना एका वॉर्डमधून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येत आहे. यावेळी त्याची आई आणि मुलगा स्ट्रेचर ओढत असल्याचे दिसत आहे. रुग्णालयातील वॉर्ड बॉयने स्ट्रेचर ढकलण्यासाठी 30 रुपये मागितले. मात्र नातेवाईकांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघं मायलेक स्ट्रेचर स्वत: ओढत घेऊन जात होते. हे वाचा-'ती बाई कोण?' अभिनेता स्वप्निल जोशीच्या समातंर 2 मध्ये काय असणार नवा ट्विस्ट? या घटनेनंतर पैसे मागणाऱ्या वॉर्ड बॉयला कामावरुन काढून टाकण्यात आलं, असे सांगितले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहताच रुग्णालयाला भेट दिली. त्यासोबत त्यांनी रुग्ण छेंदी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. छेंदी हे गौरा या गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला जखम झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांची मुलगी बिंदू आणि नातूही सोबत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या