नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : 'एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर अभंगाचा प्रत्यय सध्याच्या युगात यावा हे नवलच. मात्र असा प्रकार खरच घडला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ कोणत्या देशाचा आहे, हे अद्याप कळू शकले नसले तरी एकीचं महत्त्व दाखवणाचा व्हिडीओ प्रत्येकानं एकदा पाहण्यासारखा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेची मदत करण्यासाठी शेकडो लोकं एकत्र येऊन एक ट्रेन हलवून टाकतात. या व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांक्षु काबरा यांनी पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये एका महिलेचा पाय मेट्रो ट्रेनच्या दारात अडकल्याचे दिसत आहे. महिला पाय बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते, मात्र तिचा पाय निघत नसल्यामुळे अखेर ट्रेनमधील सर्व प्रवाशी बाहेर येतात. सर्व प्रवाशी मिळून ट्रेन हलवतात, आणि महिलेला पाय बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
वाचा-शांत उभ्या असलेल्या जिराफाची खोड काढायला आला गेंडा पुढे काय झालं पाहा VIDEO
किसी की मदद के लिए मुट्ठीभर लोग मिलकर यदि रेल हिला सकते हैं... तो 135 करोड़ में से 1-2% लोग मिलकर देश से गरीबी, अशिक्षा, पिछड़ेपन आदि को जड़ से उखाड़ भी सकते हैं...#HelpChain#LetsDoMore #kindness #HelpOthers pic.twitter.com/E82pYYlE52
— Dipanshu Kabra (@ipskabra) October 23, 2020
वाचा-10 वर्षांच्या मुलानं मृत्यूला दिली हुलकाणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
दीपांक्षु यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, मुठभर लोकं जर ट्रेन हलवू शकतात. तर 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 1-2% लोकं मिळून देशाची गरिबी, अशिक्षित या गोष्टींना उपटून फेकू शकतात.
वाचा-फॉरनर्सला लाजवेल अशी इंग्रजी कॉमेंट्री करतात हे मुख्याध्यापक, एकदा VIDEO पाहाच
हा व्हि़डीओ कधीचा आहे आणि कोणत्या देशाचा आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral