मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Watch Video: पावसामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा दाखवण्यासाठी काश्मिरी चिमुकली बनली रिपोर्टर, ग्राउंड रिपोर्ट Viral

Watch Video: पावसामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा दाखवण्यासाठी काश्मिरी चिमुकली बनली रिपोर्टर, ग्राउंड रिपोर्ट Viral

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या भागातील रस्त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या भागातील रस्त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या भागातील रस्त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे.

श्रीनगर, 30 मे:  सोशल मीडिया (Social Media) हे लोकांशी कनेक्ट होण्याचं आणि आपल्या समस्या मांडण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे. अनेक जण सोशल मीडियावरून आपापल्या भागांतील समस्या मांडतात, अनेकदा तर संबंधित विभाग किंवा नेते मंडळी त्याची दखल घेतात आणि या समस्येचं निराकरण होतं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे मदत मिळाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या भागातील रस्त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे. तिच्या ग्राउंड रिपोर्टिंगचा व्हिडिओ (Reporting Video) सध्या चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडिओ काश्मीरमधला (Kashmir) आहे. काश्मीरमध्ये सध्या पाऊस आणि बर्फवृष्टी (Snowfall) सुरू आहे. बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्यामुळे रस्ते चिखलमय झाले असून तिथून नीट चालताही येत नाही. हेच रस्ते दाखवण्यासाठी काश्मीरची एक चिमुकली मुलगी रिपोर्टर झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत परिसरातील चिखल आणि खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. High Blood Pressure असलेल्या रुग्णांनी आहारात समाविष्ट करावे हे पदार्थ, हृदय राहील निरोगी तिचा हा व्हिडिओ एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सीनिअर रिपोर्टर उमाशंकर सिंह यांनी ट्वीट केलाय. “काश्मीरमधील खराब रस्त्यांचा अतिशय गोंडस ग्राउंड रिपोर्ट आणि ग्राउंड रिपोर्टर… कॅमेऱ्याच्या मागे तिची आई आहे. हे प्रकरण बर्फवृष्टीनंतरचं आहे, असं कळतंय. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, जेणेकरून घरी पाहुणे येऊ शकतील, अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे,” असं कॅप्शन देत सिंह यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेली ही मुलगी परिसरातील खराब रस्ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती मुलगी तक्रार करत आहे, की रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे पाहुणे तिला भेटायला घरी येऊ शकत नाहीत. रिपोर्टिंग करताकरता ही चिमुकली तिच्या कॅमेरा सांभाळणाऱ्या आईला रस्त्यावरील खड्डे दाखवायला सांगते. चिखल आणि पावसामुळे परिस्थिती कशी बिकट झाली आहे, हेही मुलगी सांगते. मोबाईल फोनवर शूट केलेल्या या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये खड्डे दाखवत ती रस्त्यावरून पुढे जाते. लोक रस्त्यावर कचरा फेकतात आणि त्यामुळे सगळं कसं घाण झालंय, याबद्दलही ती सांगते. तसंच ही छोटी रिपोर्टर प्रेक्षकांना तिचा व्हिडिओ ‘लाइक, शेअर आणि सबस्क्राईब’ करण्यास सांगतीये आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू असं सांगते. BJP नी घोडेबाजार केल्याचा आरोप, फडणवीसांनी संजय राऊतांना सुनावलं  हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 62 हजार जणांनी पाहिला असून, साडेनऊ हजार युजर्सनी लाईक केलाय. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. स्वतः उमाशंकर सिंह म्हणतात, “मला पत्रकार म्हणून वार्तांकन करताना बिहारमधील करहराचा पूल दोन वर्षांत बांधता आला नाही, मात्र काश्मीरच्या या चिमुकलीच्या रिपोर्टिंगनंतर तिथे रस्ता बांधला जाईल, असा विश्वास आहे.” अनेकांनी काश्मिरच्या या चिमुकलीच्या रिपोर्टिंगचं कौतुक केलंय.
First published:

Tags: Jammu kashmir, Viral video.

पुढील बातम्या