मुंबई, 10 सप्टेंबर : कोरोना काळात सर्वांनाच संसर्गाची भीती वाटत आहे. अशा स्थितीमध्ये धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एका पांढऱ्या चादरीत माणूस दिसत आहे. तो मृत आहे की जिवंत हे पाहण्यासाठी तिथे गर्दी जमा होते.
लोकांची गर्दी आणि कल्ला पाहून हा तरुण घाबरून उठला आणि उभा राहिला. हे पाहून जमा झालेले लोक मृत माणूस जिवंता झाला या भ्रमात पऴून गेले. कोरोना काळात हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अवनीश यांनी हा व्हिडीओ शेअर करताना 'आजकाल लोक शांतपणे झोपूही देत नाहीत' असं मजेशीर कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत 9 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक आणि रिट्वीट केला आहे.
या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची चादर ओढून तरुण रस्त्याच्या कडेला झोपला आहे. तो मृत असल्याचं लोकांना आणि पोलिसांना वाटल्यानं परिसरात खळबळ उडाली पण प्रत्यक्षात जेव्हा या तरुणाला जाग आली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. देशात कोरोनामुळे आधीच भीती असताना या प्रकारानं काही वेळ मोठी खळबळ उडाली होती.