VIDEO VIRAL : अनोखं मातृप्रेम! भुकेनं व्याकूळ झालेल्या पिल्लाची ती झाली आई

VIDEO VIRAL : अनोखं मातृप्रेम! भुकेनं व्याकूळ झालेल्या पिल्लाची ती झाली आई

माकडाच्या पिलाला कुत्रीनं लावला लळा. स्वत:च्या पिलाप्रमाणे दूध पाजून गावातून मारतात फेरफटका.

  • Share this:

जळगाव, 15 फेब्रुवारी: पोटच्या गोळ्याला संपवणारी आणि स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवावर उठणारी माणसं आजच्य़ा जगात आपण पाहातो. पुण्यात दोन दिवसांच्या बाळाला कचरा कुंडीत टाकल्याची घटना ताजी असतानाच जळगावमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्य़ाशिवाय राहात नाही. हा व्हिडिओ म्हणजे मातृप्रेम म्हणून सोशल मीडियावर कौतुकाचा विषय झाला आहे. जामनेर तालुक्यातील तळेगाव मध्ये एक आगणं वेगळं मात्रृ प्रेम पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपासून गावात माकडाच्या पिलाला एक कुत्री आपल्या स्वतःच्या पिलाप्रमाणे दररोज प्रेमाने दूध पाजत आहे. आपल्या पोटच्या पिलाप्रमाणे नित्य नियमानं ती त्या माकडाच्या पिलाला ही जपते. कुत्री जाईल तिथे तिच्या पाठीवर स्वार होऊन हे माकड पिल्लू गावात ऐटीत फेरफटका ही मारतं. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशासाठी हा कुतूहलाचा विषय झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनोखं मातृप्रेम पाहून आजूबाजूच्या रहिवाशासाठी हा कुतूहलाचा विषय झाला आहे . कदाचित या पिलाची आई वारली असावी आणि त्या पिलाचे दुःख पाहून मादी कुत्रीच्या मातृत्वाच्या भावना जागृत झाल्या असाव्यात व त्यातूनच हे मातृत्वाचे प्रेम निर्माण झाले असावे परंतु मनुष्य प्राण्यांसाठी यातून नक्कीच बोध घेण्यासारखा दिसत आहे. मनुष्य याचा आदर्श केव्हा घेईल असा प्रश्न युझर्सही विचारत आहेत.

हेही वाचा-अचानक समोर आलेली स्वत:बद्दलची बातमी वाचून न्यूज अँकर झाली नि:शब्द, व्हिडीओ VIRAL

हेही वाचा-टिकटॉक VIDEO बनवण्यासाठी हिसकावलं लोकांच्या हातातील खाणं आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading