अबब! मगर आहे की डायनासोर, महाकाय प्राण्याला पाहून लोकही झाले हैराण, पाहा VIDEO

अबब! मगर आहे की डायनासोर, महाकाय प्राण्याला पाहून लोकही झाले हैराण, पाहा VIDEO

बर्‍याच लोकांनी या मगरची तुलना डायनासोरशी केली.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : फ्लोरिडामध्ये वादऴादरम्यान एक मोठी मगर शहरात शिरली आणि संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली याचं कारण म्हणजे ही मगर इतकी विशाल आणि महाकाय होती की तिला पाहून अर्ध्या लोकांची घाबगुंडी उडाली. हा आक्राळविक्राळ प्राणी गोल्फ कोर्समध्ये शिरताना पाहून अनेकांच्या काळजात धस्स झालं. फ्लोरिडामध्ये मोठ्या मगरी असामान्य नाहीत. या राज्यात सुमारे 1.25 दशलक्ष मगरी आहेत. पण असा महाकाय विशाल प्राणी तोही मगरीसारखा पाहून मात्र सगळेच अवाक झाले आहेत.

बर्‍याच लोकांनी या मगरची तुलना डायनासोरशी केली. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणार्‍या टायलर स्टोलिंग यांनी देखील हा डायनासोरसारखा प्राणी असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत हा सर्वात मोठा प्राणी असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रण्याला पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली तसंच काहीसं भीतीचं वातावऱणही आहे. या मगरीला पाहून धक्का बसल्याची माहिती देखील या व्यक्तीनं स्थानिक मीडियाला दिली.

वालेन्सिया गोल्फ अॅण्ड कन्ट्री क्लबने याचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. मेलबर्नमधील एका गोल्फ कोर्समध्ये देखील महाकाय मगर दिसली होती असा दावा करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 200 हून अधिक लोकांनी कमेंट्स करून शेअर केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 7:21 AM IST

ताज्या बातम्या