Home /News /viral /

जिगरी दोस्त! मित्राला वाचवण्यासाठी 3 वर्षांच्या मुलानं लावली जीवाची बाजी, पाहा VIDEO

जिगरी दोस्त! मित्राला वाचवण्यासाठी 3 वर्षांच्या मुलानं लावली जीवाची बाजी, पाहा VIDEO

या 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या धाडसाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.

    मुंबई, 27 ऑगस्ट : कोरोना काळात एकमेकांना मदतीचा हात देत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एका चिमुकल्यानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाच्या शौर्याचं कौतुक होत आहे. चिमुकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्विमिंगपूल जवळ दोन मुलं खेळत असताना एक त्यातला पाण्यात पडतो. या मुलाला वाचवण्यासाठी दुसरा चिमुकला आपल्या जीवाची बाजी लावतो. हा व्हिडीओ 17 ऑगस्ट रोजी या मुलाच्या आईनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे वाचा-बकाबक खातोय ताटभर गुलाबजाम; VIDEO पाहताना तुम्हीही म्हणाल, अरे!आता तरी थांब स्विमिंगपूलमध्ये एकटं सोडणाऱ्या पालकांनी हा व्हिडीओ नक्की पाहायला हवा. खेळता खेळता मित्र पाण्यात पडतो हे पाहून मुलगा आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धडपड करतो. ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील इटपरुनाची ही घटना आहे. 17 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ मुलाची आई पोलियाना कन्सोल डी ऑलिव्हिएरा यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. माझा मुलगा आर्थरनं आपल्या मित्राचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ त्यांच्याच घराजवळील स्विमिंगपूलमधील असल्याचं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. आई-वडिलांना न सांगता ही मुलं घराबाहेर स्विमिंगपूलमध्ये गेले. खेळताना मित्र पाण्यात पडला. 3 वर्षांच्या मुलानं धाडस दाखवून आपल्या मित्रानं बाहेर काढलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या