मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रावण दहनादरम्यान घडला भयंकर प्रकार; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

रावण दहनादरम्यान घडला भयंकर प्रकार; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडलं पाहा VIDEO

रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडलं पाहा VIDEO

रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडलं पाहा VIDEO

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : देशात रविवारी विजयादशमीचा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कोरोना विषाणूरुपी रावण घालवण्यासाठी सर्वांनी संकल्प केला. तर वेगवेगळ्या भागांमध्ये रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. रविवारी देशात दसरा साजरा केला जात होता. यावेळी देशातील बर्‍याच भागात रावणांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. कोरोना संसर्गामुळे यंदाचा उत्सव अगदी मोजक्या लोकांमध्ये साजरा करण्यात आला. दरम्यान, पंजाबच्या बटाला रावण व्हिडीओमध्ये रावण दहनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. रावणाच्या पुतळ्याला आग लावताना अचानक फटाक्यांचा आवाज आल्यासारखे स्फोट झाले. उपस्थित नागरिकांना जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढावा लागला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-चालकाचं सुटलं नियंत्रण आणि...भरधाव ट्रॅक्टरनं तिघांना चिरडलं, पाहा LIVE VIDEO मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पंजबाच्या बटाला परिसरात घडली आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडता घडता थोडक्यात टळली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सुमारे 20 फूट उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला होता. काही लोकांनी या रावणाच्या पुतळ्याच्या जवळ जाऊन आग लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात असलेले फटाके फुटण्यास सुरुवात झाली. या घटनेमुळे मोठी खऴबळ उडाली होती. थोडक्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Panjab, Viral video.

पुढील बातम्या