हा कसला आनंद! काँग्रेस नेत्याने नातीच्या लग्नात केली फायरिंग, VIDEO व्हायरल

हा कसला आनंद! काँग्रेस नेत्याने नातीच्या लग्नात केली फायरिंग, VIDEO व्हायरल

काँग्रेस नेत्याने आपल्या नातीच्या लग्नात हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

चंदीगढ, 09 फेब्रुवारी: काँग्रेस नेत्याने आपल्या नातीच्या लग्नात हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं आपल्या नातीच्या लग्नाचा आनंद साजरा करत असताना बंदुकीतून हवेत गोळीबार केला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ दोन आठवड्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ चंदीगढ इथल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा आहे.

अजैब सिंह रटोल यांनी आपल्या आपल्या नातीचं लग्न धुमधडाक्यात करून दिलं. त्याच दरम्यान परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानं यासंदर्भात सफाई दिली आहे. 'मी माझ्या नातीच्या लग्नाचा आनंद साजरा करत होतो. त्यातून कुणालाही घाबरवण्याचा भीती दाखवण्याचा कोणताही हेतू नव्हता. कुणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो.' असंही काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे.

या प्रकरणी चंदीगढ पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अशा पद्धतीनं आनंद साजरा करणं कितपत योग्य आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे. एक नाही दोन नाही तब्बल तीन ते चार वेळा पिस्तुलानं हवेत गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून पुढे काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा-VIDEO: रिपोर्टिंग करतानाच महिला रिपोर्टरवर सापाचा हल्ला, पाहा मग काय झालं

हेही वाचा-शिकारी खुद शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला खाल्लं, पाहा थरारक VIDEO

First Published: Feb 9, 2020 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading