VIDEO : नवरीची एन्ट्री आहे की, Undertaker ची; गृहप्रवेशाचं असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल

VIDEO : नवरीची एन्ट्री आहे की, Undertaker ची; गृहप्रवेशाचं असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल

लग्नानंतर सासरी नवरीचं असं काही स्वागत झालं की, व्हिडिओ पाहून तुम्ही चाट व्हाल.

  • Share this:

लग्न प्रत्येक तरुणीच्या जीवनाचं स्वप्न असतं. प्रत्येक मुलीला वाटतं की, लग्नाच्या दिवसाची आठवण तिला आयुष्यभर राहावी. अशात जर लग्नाच्या दिवशी नवरदेवाकडील मंडळींनी नवरीसाठी काही खास आणि अनोखं केलं, तर याहून आनंदाची बाब अजून काय असू शकते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून कोणत्याही मुलीला वाटेल की ती सासरी जाईल तेव्हा तिचंही असंच स्वागत व्हावं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @gostudyiqraa नावाच्या युजरने ट्वीटवर शेअर केला आहे. व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरासमोर नवरा-नवरी उभे आहेत. त्यांच्यासोबत वऱ्हाडीदेखील उभे आहेत. घर अत्यंत रॉयल पद्धतीने सजविण्यात आलं आहे. जशी घरात नवरीचा प्रवेश होता, मोठी आतिशबाजी सुरू होते, संपूर्ण घर फटाक्यांनी उजळून निघलं.

हे ही वाचा-VIDEO: यांना कोणीतरी आवरा रे! मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव

हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. व्हिडिओ पाहून वाटतं की, WWE च्या फाइटपूर्वी अंडरटेकरची एन्ट्री होणार आहे. तुम्ही कधी WWE ची फाइट पाहिली असेल तर तुम्हालादेखील तो सीन आठवेल. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. लोक या व्हिडिओचं कौतुक करीत आहे. सोबतच मजेशीर कमेंट्सही करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: May 8, 2021, 4:56 PM IST

ताज्या बातम्या